बारामतीकर जनतेने केलेला माझा करेक्ट कार्यक्रम मी स्वीकारला! – अजित पवार
शरद पवार यांच्या वयाचा विचार करता त्यांनी आवाहन केल्याप्रमाणे लोकसभेला पवार साहेबांचं तुम्ही सगळ्यांनी ऐकलं. लोकसभेच्या काळात जर काही झालं, तर ते कोणाला आवडणार नाही. या सर्वांचा विचार करून तुम्ही पद्धतशीर आमचा कार्यक्रम केला. जयंत पाटलांच्या भाषेत सांगायचं झालं तर, करेक्ट कार्यक्रम केला. आम्ही पण तो कार्यक्रम स्वीकारला. अशी मिश्कील टिप्पणी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली.
अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील वानेवाडी येथील ग्रामस्थांशी संवाद साधला. ते म्हणाले, लोकसभेला अनेकांनी काय काय केलं, हे सर्व बूथ बघितल्यावर लक्षात येतं. आता मात्र मी तुमच्याकडे हक्काने आलो आहे. मी ज्या वेळेस तुमची आमदारकी स्वीकारली, तेव्हापासून जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न केला आहे. मी कुठेही आळशीपणा दाखवला नाही. मी कुठेही कामात व निधी देण्यात कमी पडलो नाही.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List