ठाणे, पालघर, रायगडातील शिवसेना शिलेदारांचे वाजतगाजत अर्ज दाखल; प्रचंड जल्लोष, उदंड उत्साह…हजारो निष्ठावंत शिवसैनिकांची गर्दी

ठाणे, पालघर, रायगडातील शिवसेना शिलेदारांचे वाजतगाजत अर्ज दाखल; प्रचंड जल्लोष, उदंड उत्साह…हजारो निष्ठावंत शिवसैनिकांची गर्दी

वसुबारसचा मुर्त साचत आज ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यातील शिवसेना (उद्धव चाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिलेदारांनी वाजतगाजत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले, त्यापूर्वी प्रचंड जल्लोष आणि उर्दड उत्साहात रॅली काढण्यात अंबरनाथ, बेलापूर, ऐरोली, उरण, कर्जत, महाड, बोईसर अशा असंख्य मतदारसंघांमध्ये निवडणूक 2024 महाविकास आघाडीचाच बोलबाला दिसून आला. विधानसभा निवडणुकीत गहारांना धडा शिकवण्याचा निर्धार करण्यात आला असून शिवसेनेसह महाविकास आघाडीच्या उमेदवारांना दणदणीत मतांनी विजयी करणारच, अशी शपथ कार्यकत्यांनी घेतली.

डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उमेदवार दीपेश म्हात्रे यांनी दणदणीत रॅलीनंतर आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, यावेळी कल्याण ग्रामीणमधील उमेदवार सुभाष भोईर, जयेश म्हात्रे, महिला आघाडीच्या वैशाली दरेकर, माजी महापौर पुंडलिक म्हात्रे, शहरप्रमुख अभिजित सावंत, प्रकाश तेलगोटे, काँग्रेसचे संतोष केणे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे भालचंद्र पाटील उपस्थित होते.

उरणमधून शिवसेनेचे उमेदवार मनोहर भोईर यांनी आपला अर्ज दाखल केला. त्यापूर्वी मोठी रॅलीही काडण्यात आली. यावेळी उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या भावना माणेकर, शेकापचे राजेंद्र पाटील, अॅड. संतोष खांडकर, उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील उपस्थित होते. कर्जत-खालापूरमधून शिवसेनेचे उमेदवार नितीन सावंत यांनी वाजतगाजत रॅली काढून आपला अर्ज दाखल केला, यावेळी तालुकाप्रमुख उत्तम कोळंबे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश टोकरे, कॉ, गोपाळ शेळके यांच्यासह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.

बोईसर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे डॉ. विश्वास वळवी यांनी अर्ज दाखल केला. त्यापूर्वी बैलगाडीतून त्यांची भव्य रॅली निघाली. यावेळी जिल्हाप्रमुख अनुप पाटील, अजय ठाकूर, लोकसभा संघटक जनार्दन पाटील, पंकज देशमुख, नचिकेत पाटील, शिवसेना महिला जिल्हा संघटक नम्रता वैती, शहरप्रमुख मनोज संखे, उपजिल्हाप्रमुख दिलीप चेंदवणकर आदी उपस्थित होते.

सकाळपासूनच शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे आतावरण दिसून आले. चौकाचौकात शिवसेनेचा भगवा शेंडा डौलाने फडकत होता. प्रत्येकाच्या हाती धगधगती मशाल होती. डोंबिवलीत शिवसेनेचे उमेदवार दीपेश म्हात्रे यांची सम्राट चौक ते स. वा. जोशी महाविद्यालयापर्यंत दणदणीत रॅली निघाली. कल्याण पूर्वचे उमेदवार धनंजय बोडारे यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी विठ्ठलवाडीच्या श्रीराम टॉकीज चौकातून प्रचंड मिरवणूक काढली. मुरबाड, बोईसर, डहाणू, जव्हार, उरण, कर्जत येथेही महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी काढलेल्या रॅलीला तुफान प्रतिसाद मिळाला. शिवसेना झिंदाबादच्या घोषणांनी ठाणे, रायगड, पालघर जिल्हा दणाणून गेला.

यांनी भरले अर्ज
केदार दिखे (को परी- पाचपाखाडी), राजेश वानखडे (अंबरनाथ), सुभाष पवार (मुरबाड), धनंजय बोडारे (कल्याण पूर्व), दीपेश म्हात्रे (डोंबिवली), महादेव घाटाळ (भिवंडी ग्रामीण), मुझफ्फर हुसेन (मीरा-भाईंदर), स्नेहल जगताप (महाड), मनोहर भोईर (उरण), नितीन सावंत (कर्जत-खालापूर), डॉ. विश्वास वळवी (बोईसर), विनोद निकोले (डहाणू), सुनील मुसारा (विक्रमगड), ओमी कलानी (उल्हासनगर), एम.के. मढवी (ऐरोली), संदीप नाईक (बेलापूर), महाड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या स्नेहल जगताप यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य वाळ राऊळ, सहसंपर्कप्रमुख अमित मोरे, जिल्हा प्रवक्ते धनंजय देशमुख, माजी नगराध्यक्ष संदीप जाधव उपस्थित होते.

ऐरोली विधानसभा मतदारसंघातील शिवसेना महाविकास आघाडीने उमेदवार एम. के. मढवी यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केल्य याप्रसंगी शिवसेना नेते राजन विचारे, जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, जिल्हा संघटक रंजना शिंत्रे, कशीसचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक, उपजिल्हाप्रमुख सूर्यकांत मढवी, आत्माराम सणस, किशोर विचारे, संजर तुरे, शहरप्रमुख प्रवीण म्हात्रे, उपजिल्हा संघटक विनया मढवी आदी उपस्थित होते.

भिवंडी ग्रामीणमधून शिवसेनेचे महादेव घाटाळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यापूर्वी वाजतगाजत रॅलीही काढण्यात आली. यावेळी खासदार बाळयामामा म्हात्रे, भारतीय कामगार सेनेचे माजी सरचिटणीस कृष्णकांत कोंडलीकर, उपजिल्हाप्रमुख प्रकाश भोईर, इरफान भुरे, तालुकाप्रमुख कुंदन पाटील, जिल्हा सचिव जय भगत, दीपक पाटील, विधानसभा संघटक हनुमान पाटील आदी उपस्थित होते.

कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे धनंजय बोडारे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत, कल्याण पूर्वचे शहरप्रमुख शरद पाटील, माजी आमदार पप्पू कलानी उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत, तांत्रिक बिघाडामुळे गाड्या उशिराने मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत, तांत्रिक बिघाडामुळे गाड्या उशिराने
Mumbai Local Running Late : मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असणाऱ्या मुंबई लोकलची सेवा विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेवर तांत्रिक बिघाड...
जोगेश्वरीत वायकरांकडून पैसे आणि भेटवस्तूचे वाटप, शिवसैनिक गद्दार मिंध्यांना भिडले
कर्नाटकात सरकार पाडण्यासाठी आमदारांना 50 खोक्यांची ऑफर; मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या आरोपाने खळबळ
महाराष्ट्र म्हणून एक राहिलो तर भाजप आणि मिंधेंपासून सेफ राहू! आदित्य ठाकरे यांचे मतदारांना आवाहन 
वार्तापत्र – वर्सोव्यात मशाल धगधगणार
आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवणे ‘घटनाबाह्य’! सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल; भाजपशासित राज्यांना मोठा दणका
झारखंडमध्ये 65 टक्के मतदान, 683 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद