सोने-चांदीला झळाळी! दिवाळीच्या तोंडावर चांदीचा भाव 1 लाख तर, सोनं 80 हजारांच्या पार!

सोने-चांदीला झळाळी! दिवाळीच्या तोंडावर चांदीचा भाव 1 लाख तर, सोनं 80 हजारांच्या पार!

सध्या सणासुदीचे दिवस आहेत. सोने आणि चांदीच्या दरात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. या काळात लोक आवडीने दागिने खरेदी करतात. असे असताना सोने-चांदीचे दर वाढलेले दिसत आहेत. आज 23 ऑक्टोबर, पुन्हा एकदा सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात वाढ झाली आहे. चांदीचा दर थेट एक लाखाच्यावर गेला आहे. विशेष म्हणजे सोन्याच्या दरानेही 81 हजार रुपयांचा आकडा पार केला आहे.

सोने आणि चांदीच्या दराने उच्चांक पातळी गाठली आहे. चांदीचा भाव 1500 रुपयांच्या वाढीसह एक लाख रुपये प्रति किलो ग्रॅमवर पोहोचला आहे. गेल्या आठवड्यात शुक्रवारी चांदीचा भाव 99,500 प्रति किलोग्रॅम होता. चांदीच्या दरातील ही पाचवी दरवाढ असून चांदीचा दर 1.01 लाख रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला आहे. तसेच सोन्याच्या दरातही 99.5 टक्के शुद्धतेचे सोने 350 रुपयांनी वाढून 80,600 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे.

सोने आणि चांदीच्या दरात का होतेय वाढ?

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात वाढ होत आहे. यामागे अनेक कारणं आहेत. सध्या सणासुदीचा काळ आहे. त्यामुळे या काळात देशात दागिन्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी होते. लग्नसराईलाही सुरुवात होणार आहे. त्यामुळे सोने आणि चांदीच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होते. त्यामुळे सध्या सोने आणि चांदीच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. दुसरीकडे जागतिक पातळीवरही मोठ्या घडामोडी घडत आहेत. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धामुळेही सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘सर्व औषधे मोफत, महाराष्ट्रातील जनतेला 25 लाखांचा विमा’, मल्लिकार्जुन खर्गे यांची मोठी घोषणा ‘सर्व औषधे मोफत, महाराष्ट्रातील जनतेला 25 लाखांचा विमा’, मल्लिकार्जुन खर्गे यांची मोठी घोषणा
महाविकास आघाडीची आज मुंबईतील बीकेसीत प्रचारसभा पार पडली. या सभेला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख...
शेतकऱ्यांचं किती लाखांचं कर्ज माफ करणार?; शरद पवार यांची महागॅरंटी काय?
महाविकास आघाडीकडून लाडक्या भावांना मोठं गिफ्ट, दर महिन्याला इतके हजार मिळणार, उद्धव ठाकरेंची घोषणा
जातीनिहाय जनगणना करू आणि 50 टक्के आरक्षणाची मर्यादा तोडू – राहुल गांधी
महिलांना महिन्याला 3 हजार रुपये खटाखट खटाखट देणार… बसमध्ये प्रवास फ्रि; राहुल गांधी यांनी दिली महागॅरंटी
मुंब्य्रात महाराजांचं मंदिर बांधण्याच्या फडणवीसांच्या आव्हानावर काय म्हणाले उद्धव ठाकरे
कोरोना काळात आम्ही धारावी वाचवली होती आता पुन्हा एकदा धारावी वाचवणार, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन