तो प्रश्न विचारताच भडकला राजपाल यादव; पत्रकाराचा कॅमेराच हिसकावला, व्हिडीओ व्हायरल

तो प्रश्न विचारताच भडकला राजपाल यादव; पत्रकाराचा कॅमेराच हिसकावला, व्हिडीओ व्हायरल

अभिनेता राजपाल यादव सध्या त्याच्या एका व्हिडीओमुळे सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये तो एका पत्रकाराचा कॅमेरा ओढताना दिसून येत आहे. राजपालला त्याच्या माफीनाम्याच्या व्हिडीओवरून संबंधित पत्रकाराने प्रश्न विचारला होता. या प्रश्नावर चिडून त्याने थेट कॅमेरा ओढण्याचा प्रयत्न केला. काही दिवसांपूर्वी राजपालने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांना दिवाळीत फटाके न फोडण्याची विनंती केली होती. फटाक्यांमुळे मुक्या प्राण्यांना त्रास होतो, असं त्याने म्हटलं होतं. यावरून नेटकऱ्यांनी त्याचा एक जुना व्हिडीओ शेअर करत ट्रोल केलं होतं. या जुन्या व्हिडीओमध्ये राजपाल मांसाहार करताना दिसला होता. एकीकडे प्राण्यांना होणाऱ्या त्रासाविषयी बोलणारा राजपाल स्वत: मात्र मांसाहार करतोय, अशी टीका नेटकऱ्यांनी केली होती. या टीकेनंतर राजपालने त्याचा फटाक्यांचा व्हिडीओ डिलिट करत नेटकऱ्यांची हात जोडून माफी मागितली होती.

उत्तरप्रदेशच्या एका हिंदी पब्लिकेशनसाठी काम करणाऱ्या पत्रकाराने सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये राजपालच्या आजूबाजूला काही लोकं दिसत असून तो पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं देत आहे. जेव्हा एक पत्रकार त्याला दिवाळीतील व्हिडीओसंबंधी प्रश्न विचारतो, तेव्हा राजपाल त्याच्यावर वैतागतो आणि त्याचा कॅमेरा हिसकावण्याचा प्रयत्न करतो. हाच व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करणाऱ्या पत्रकाराने असा दावा केला आहे की राजपालने तो फोन फेकण्याचा प्रयत्न केला होता. हे काही क्षणसुद्धा कॅमेरात कैद झाले.

राजपाल यादवचा माफीनामा

‘मी मनापासून माफी मागतो. माझा हेतू दिवाळीचा आनंद कमी करण्याचा नव्हता. दिवाळी हा आपल्या आनंदाचा आणि प्रकाशाचा सण आहे. दिवाळी सर्वांसाठी सुंदर बनवण्यातच आपला खरा सण आहे. तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि प्रेम. सर्वजण मिळून या दिवाळीला खास बनवुयात,’ असं कॅप्शन लिहित राजपालने माफीचा व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये राजपाल म्हणाला, “सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आता दोन दिवसांपूर्वी मी माझ्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. तो व्हिडीओ मी लगेच काढून टाकला. या व्हिडीओमुळे देशातील आणि जगातील ज्या लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, त्यांची मी मनापासून माफी मागतो. दिवाळीनिमित्त आनंद साजरा करा, स्वस्थ राहा आणि मस्त राहा.”

फटाक्यांमुळे वायू आणि ध्वनी प्रदूषण होतो आणि प्राण्यांनाही त्रास होतो, म्हणून शांततेत दिवाळी साजरी करा, असं आवाहन त्याने केलं होतं. मात्र यावरून नेटकऱ्यांनी त्याला प्रचंड ट्रोल केलं होतं. राजपालचा जुना मांसाहारी बिर्याणी खातानाचा व्हिडीओ पुन्हा शेअर करत नेटकऱ्यांनी त्याच्यावर टीका केली होती. एकीकडे मांसाहार करता आणि दुसरीकडे दिवाळीला फटाके फोडून प्राण्यांना त्रास देऊ नका, असं म्हणता.. अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या होत्या.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘अनुपमा’च्या सेटवर दुर्दैवी मृत्यू तरीही शूटिंग ठेवली सुरू; निर्मात्यांकडून 1 कोटीची मागणी ‘अनुपमा’च्या सेटवर दुर्दैवी मृत्यू तरीही शूटिंग ठेवली सुरू; निर्मात्यांकडून 1 कोटीची मागणी
स्टार प्लस वाहिनीवरील ‘अनुपमा’ ही अत्यंत लोकप्रिय मालिका गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. या मालिकेतील काही कलाकारांनी अचानक शो...
नाग चैतन्यच्या दुसऱ्या लग्नाची पत्रिका व्हायरल; या दिवशी अडकणार लग्नबंधनात
Miss Universe 2024: डेनमार्कची व्हिक्टोरिया झाली ‘मिस युनिव्हर्स’, आनंद व्यक्त करत म्हणाली…
Dapoli News – राजकीय अनास्थेमुळे बुरोंडी बंदर समस्यांच्या गर्तेत
मुंबईकरांचा आवाज दाबायला निघालेल्या सरकारला घरी बसवल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही! आदित्य ठाकरे यांची गर्जना
अजित पवार जातीयवादी, नेहमी OBC, ST, NT समाजाच्या बजेटमध्ये कपात केली; जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
मृत समजून कुटुंबाने अंत्यसंस्कार उरकले, शोकसभेत मुलगा जिवंत घरी परतला