हास्यजत्रा फेम शिवाली परबच्या चेहऱ्याला नेमकं झालं तरी काय? व्हिडीओमुळे चर्चा
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ॲसिड हल्ल्यानंतर विद्रुप झाल्यासारखा तिचा चेहरा पाहून चाहत्यांना एकच धक्का बसला. आता या फोटोमागचं रहस्य उलगडलं आहे. जन्मा- मरणाच्या आणि नशिबाच्या गोष्टींची अभूतपूर्व कथा ‘मंगला’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात शिवाली परब मुख्य भूमिका साकारतेय. ॲसिड हल्ल्यानंतर एका सुंदर गायिकेची काय अवस्था होते, याची कथा या चित्रपटातून पहायला मिळणार आहे. याचा टीझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. मंगलावर ॲसिड हल्ला कोण आणि का करतं आणि त्यानंतर तिचं आयुष्य कसं बदलतं, याची कथा या चित्रपटातून पहायला मिळणार आहे. येत्या 17 जानेवारी रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
‘मंगला’ हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असून त्यात एका भयावह हल्ल्यातून वाचलेल्या मंगला या प्रसिद्ध गायिकेचा जीवनप्रवास उलगडणार आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परब यात मुख्य भूमिका साकारणार आहे. ॲसिड हल्ल्यानंतर मंगलाचं आयुष्य कशाप्रकारे बदलतं, ते या चित्रपटात पहायला मिळणार आहे. या टीझरमध्ये दिसतंय की, मंगलावर ॲसिड हल्ला होतो आणि त्यानंतर त्या हल्ल्याची खूण तिला सतावत आहे. हे चित्र जरी पाहण्याजोगं नसलं तरी त्यामागील गहन विषय खुर्चीला खिळवून ठेवणारा असेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
‘मंगला’ या चित्रपटाचं दिग्दर्शन अपर्णा हॉशिंग यांनी केलं आहे. तर अपर्णा हॉशिंग, मोहन पुजारी, यश्ना मुरली, मिलिंद फोडकर यांची निर्मिती आहे. या चित्रपटाची कथा आणि पटकथा सौरभ चौधरीने लिहिली असून प्रथमेश शिवलकरने संवाद लिहिले आहेत. शंतनू घटकने या चित्रपटाला संगीत दिलं आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून शिवाली परब एका वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List