घटस्फोटानंतर मुलाला विसरला आमिर खान? पूर्व पत्नी किरण म्हणाली “शाळेविषयी त्याला काहीच..”

घटस्फोटानंतर मुलाला विसरला आमिर खान? पूर्व पत्नी किरण म्हणाली “शाळेविषयी त्याला काहीच..”

अभिनेता आमिर खान आणि किरण राव हे 2021 मध्ये विभक्त झाले. घटस्फोटानंतर मुलगा आझादचं संगोपन दोघं मिळून करत आहेत. मात्र व्यग्र वेळापत्रकामुळे मुलांना फारसा वेळ देता येत नसल्याची खंत त्याने वारंवार मुलाखतींमध्ये बोलून दाखवली आहे. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत किरण याविषीय मोकळेपणे व्यक्त झाली. “आमिरला आझादच्या शाळेविषयी कोणतीच माहिती नाही”, असा खुलासा किरणने केला. कुटुंबीयांना वेळ देण्यासाठी आमिरने चित्रपटांमधून ब्रेक घेतला आहे. मात्र त्याच्या वेळापत्रकाशी जुळवून घेणं अजूनही कठीण जात असल्याचं किरणने सांगितलं आहे.

करीना कपूरच्या ‘व्हॉट वुमेन वॉन्ट’ या चॅट शोमध्ये किरण म्हणाली, “हे अजूनही खूप गुंतागुंतीचं आहे. आमिर फार बिझी असतो. प्रामाणिकपणे बोलायचं झाल्यास, घटस्फोटाच्या आधीही पालकांच्या सर्व जबाबदाऱ्या मी एकटी खंबीरपणे पार पाडत होती. मात्र घटस्फोटानंतर आमिरला या गोष्टीची जाणीव झाली आहे की आता त्यालासुद्धा आझादसाठी पुरेसा वेळ काढावा लागणार आहे. कारण जेव्हा तुम्ही एकत्र असता, तेव्हा बऱ्याच गोष्टी मॅनेज होतात. पण विभक्त झाल्यानंतर तुम्हाला बऱ्याच गोष्टी विचारात घ्याव्या लागतात.”

“आझादचं संगोपन करणं आता अधिक सोपं झालं आहे, कारण आमिरसुद्धा त्यात तितकाच सहभागी असतो. आम्ही एकाच इमारतीत वर-खाली राहतो. आझादलाही आता त्याच्या वडिलांसोबत वेळ घालवायला आवडतंय. आधी हे सगळं खूप अवघड होतं. आता मी आझादला आमिरसोबत सोडून निवांत राहू शकते. पण आमिरला त्याच्या शाळेविषयी कोणतीच माहिती नाही. माझ्या मते ही वडिलांची सर्वसामान्य समस्या असते. मुलाच्या शाळेच्या बाबतीत कोणत्या गोष्टी मला सांगू नकोस, बाकी सगळं मी हाताळेन, असं त्याचं म्हणणं असतं”, अशा शब्दांत किरण व्यक्त झाली.

घटस्फोटानंतर एकल पालकत्वात येणाऱ्या समस्यांविषयी बोलताना किरण पुढे म्हणाली, “आझाद खूप चांगला मुलगा आहे. आम्ही दोघं एकमेकांना खूप चांगल्याप्रकारे ओळखतो. एकल पालकत्वातही तुम्ही तुमच्या मुलासोबत खूप चांगलं नातं निर्माण करू शकता. आम्ही एकमेकांची सपोर्ट सिस्टीम आहोत. जेव्हा कधी मी निराश असते, तेव्हा त्याच्यासोबत जरा वेळ घालवला तरी मला बरं वाटतं. त्याची विनोदबुद्धीही खूप चांगली आहे. तो मला खूप हसवतो. एकल मातृत्वात ठळकपणे जाणवणारी एकच गोष्ट म्हणजे, तुम्हाला जेव्हा स्वत:साठी ब्रेक हवा असतो, तेव्हा तुम्हाला तो मिळेलच असं नाही. दुसरा पालक व्यग्र असेल तर गोष्टी अवघड होतात. सुदैवाने माझे आईवडील यात माझी मदत करतात.” आमिर खान आणि किरण राव यांनी 2005 मध्ये लग्न केलं होतं. लग्नाच्या 16 वर्षांनंतर ते विभक्त झाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

नवज्योत सिंग सिद्धूंनी सांगितलं कपिल शर्माचा शो सोडण्यामागचं कारण; म्हणाले.. नवज्योत सिंग सिद्धूंनी सांगितलं कपिल शर्माचा शो सोडण्यामागचं कारण; म्हणाले..
कॉमेडियन कपिल शर्माच्या शोमध्ये नवज्योत सिंग सिद्धू यांना पाच वर्षांनंतर पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या...
‘या’ अभिनेत्रीला ओळखलत का? व्हायरल व्हिडीओ क्लिपमुळे रातोरात स्टार बनली
लग्नाआधीच होणाऱ्या पतीसोबत सासरी ‘नाईट स्टे’ केल्याने भडकली सासू? समीरा रेड्डीचा खुलासा
गोविंदाची रॅली दरम्यान प्रकृती खालावली, तात्काळ रुग्णालयात दाखल, कशी आहे प्रकृती?
‘अशा पद्धतीने नीच वागून..’; भडकलेल्या नयनताराचं धनुषला खुलं पत्र
बॉबी देओलसोबत लग्न केलं असतं तर कधीच…, प्रसिद्ध अभिनेत्रीचा मोठा खुलासा
हाडांच्या मजबूतीसाठी रोज खा हे 3 पदार्थ, कॅल्शियमची भासणार नाही उणीव