शस्त्राच्या तस्करीप्रकरणी एकाला अटक
शस्त्र तस्करीप्रकरणी एकाला गुन्हे शाखेच्या युनिट 9 ने अटक केली. सोनू भंडारी असे त्याचे नाव असून तो नागपूरच्या हिंगणा रोड येथे राहतो. त्याच्याकडून पोलिसांनी दोन देशी बनावटीचे पिस्तूल आणि तीन जिवंत काडतूस जप्त केले आहे. याचा पुढील तपास युनिट 9 करत आहेत.
सांताक्रुझ परिसरात एक जण शस्त्र घेऊन येणार असल्याची माहिती युनिट 9 चे वरिष्ठ निरीक्षक दया नायक यांना मिळाली. पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक दया नायक याच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक उत्कर्ष वझे, महेंद्र पाटील, भोसले, म्हाळसक, शिंदे, गवते, चौगुले आदीच्या पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी सांताक्रुझ येथे सापळा रचला. सापळा रचून पोलिसांनी भंडारीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन देशी बनावटीच्या पिस्तूल आणि तीन जिवंत काडतूस जप्त केली. शस्त्रप्रकरणी त्याच्या विरोधात सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला. त्याला अटक करून आज न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List