बेल्जियमच्या पॅराग्लायडरचा हिमाचलमध्ये मृत्यू, पॅराशूट निकामी झाल्याने जमिनीवर पडून मृत्यू
बेल्जियमच्या पॅराग्लायडरचा हिमाचलमध्ये पॅराशूट अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील प्रसिद्ध पॅराग्लायडिंग स्पॉट बीर-बिलिंग येथे हा भीषण अपघात झाला. या घटनेत पोलिश पॅराग्लायडर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतला.
जिल्हा पर्यटन उपसंचालक विनय धीमान यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहा पॅराग्लायडर एकत्र उड्डाण करत असताना दोघे जण एकमेकांवर धडकले. धडकल्यानंतर बेल्जियमच्या 60 वर्षाच्या पॅराग्लायडरचे रिजर्व्ह पॅराशूट न उघडल्याने त्याचा जमिनीवर पडून मृत्यू झाला.
कांगडा जिल्ह्यातील बीर-बिलिंग हे पॅराग्लायडर्ससाठी नंदनवन मानले जाते. बीर-बिलिंग येथे 2 नोव्हेंबरपासून पॅराग्लायडिंग वर्ल्ड कप 2024 सुरू होणार आहे. या स्पर्धेत 50 देशांतील 130 पॅराग्लायडर्स सहभागी होणार आहेत. वर्ल्ड कपच्या चार दिवस आधीच ही घटना घडली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List