धनत्रयोदशीला झाडूखरेदी आणि पूजन करणे शुभ; जाणून घ्या याचे महत्त्व…
>> योगेश जोशी
दिवाळीची सुरुवात म्हणजे धनत्रयोदशीचा दिवस. या दिवशी धन्वंतरी, कुबेर आणि लक्ष्मीपूजनाचे महत्त्व आहे. तसेच या दिवशी झाडू खरेदी केल्याने घरात संपन्नता येते, वर्षभर कोणत्याही गोष्टींची चणचण भासत नाही, अशी मान्यता असल्याने या दिवशी अनेकजण आवर्जुन झाडू खरेदी करतात. जाणून घेऊ यामागते कारण आणि याचे महत्त्व याबाबत.
धनत्रयोदशीला लक्ष्मी, कुबेर आणि धन्वंतरीची पूजा केली जाते. या दिवशी दागदागिने, रत्ने, धातू, घरगुती उत्पादने आणि महागड्या वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. सोने, चांदी आणि महागड्या वस्तू यादिवशी खरेदी करणे शुभ आहेत. तसेच यादिवशी झाडू खरेदी करून त्याच्या पूजनाचे विशेष महत्त्व आहे. कार्तिक मासातील कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशी साजरी केली जाते.
या दिवशी झाडू खरेदीबाबत अनेक आख्यायिका आहेत. याचा संबंध थेट समुद्रमंथनाशी आहे. समुद्रमंथनातून लक्ष्मी मातेची उत्पत्ती झाली तसेच तिची बहीण अलक्ष्मी हिचीही उत्पत्ती झाली. भगवान विष्णूंनी लक्ष्मीशी विवाह करण्याची इच्छ व्यक्त केली. मात्र, माझी बहीण अल्क्षमी हिचा विवाह झाल्याशिवाय मी विवाह करणार नाही, असे लक्ष्मीने सांगितले. विष्णूने अलक्ष्मीचा विवाह एका ऋषींशी लावून दिला. त्यानंतर अलक्ष्मीला कंटाळून तो ऋषी जंगलात निघून गेला. त्यामुळे अल्क्षअमी विलाप करू लागली. तिचे म्हणणे जाणून घेतल्यावर विष्णून तिला सांगितले. जेथे कलह, अस्वस्छता, भांडणे, नकारात्मकता असतील त्या ठिकाणी तू वास्तव्य कर. तिथे लक्ष्मी कधीही येणार नाही. त्यामुळे अलक्ष्मी अस्वच्छता, नकारात्मकता असलेल्या ठिकाणी असते. जिथे अलक्ष्मी असते, तिथे लक्ष्मी कधीही येत नाही. त्यामुळे दिवाळीच्या आधी घराची स्वच्छता करत अलक्ष्मीला बाहेर काढत लक्ष्मीचे आवाहन करण्यात येते. घराची स्वच्छता करण्यात झाडूची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे झाडूला लक्ष्मीच्या आगमनाचे प्रतीक मानतात. त्यामुळे धनत्रयोदशीला झाडूखरेदी आणि त्याच्या पूजनाचे महत्त्व आहे.
धनत्रयोदशीला झाडूची खरेदी केल्याने संपन्नता वाढते, अशी मान्यता आहे. मात्र या दिवशी फुलवाल्या झाडू किंवा हिराच्या झाडूची प्रामुख्याने खरेदी केली जाते. झाडू खरेदी करताना तो भरीव आणि झुपकेदार असल्याची खात्री करुन घ्यावी. झाडूचे हिर मजबूत आहेत की नाही ते पाहून घ्यावे. ते मध्येच ती तुटता कामा नये. धनत्रयोदशीला प्लॅस्टीकच्या झाडूची खरेदी टाळावी. तसेच यादिवशी प्लॅस्टीकच्या वस्तू खरेदी करणेही टाळावे. झाडू आणल्यानंतर ती लगेच वापरायला न घेता आधी झाडूची पूजा करावी. त्यानंतर झाडूला कुंकू लावावे आणि त्यावर अक्षता टाकाव्यात. त्यानंतर झाडूचा वापर करावा.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List