विमानांना धमक्यांचं सत्र सुरूच, Air India, Vistara सह एकाचवेळी 95 विमानांना बॉम्बने उडविण्याची धमकी
विमानांना धमकी देण्याचे सत्र सुरूच आहे. आता एकाचवेळी 85 विमानांना बॉम्बने उडविण्याची धमकी मिळाली आहे. यामध्ये एअर इंडियाच्या 20 विमानांसह 20 इंडिगो, 20 विस्तारा, 25 अकासाच्या आणि स्पाईस जेट आणि अलायन्स एअर यांच्या प्रत्येक 5 अशा एकूण 95 विमानांना बॉम्बने उडविण्याची धमकी मिळाली आहे. गेल्या 10 दिवसांत 250 विमानांच्या उड्डाणांना या धमक्यांमुळे फटका बसला आहे.
वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, याआधी दिल्ली पोलिसांनी आठ दिवसांत 90हून अधिक डोमेस्टीक आणि इंटरनॅशनल विमानांना बॉम्बने उडविण्याच्या धमकी प्रकरणात आठ वेगवेगळे एफआयआर दाखल केले आहेत. ज्या विमानांना धमकी मिळाली आहे त्यामध्ये अकासा, एअर इंडिया, इंडिगो आणि विस्तारा या विमानांचा समावेश आहे. ही विमाने दिल्लीहून विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ठिकाणी जाणारी होती. पोलिसांच्या माहितीनुसार, याचा तपास सुरू आहे.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, धमकीचे मेसेज सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर मिळाले होते. मात्र, त्यानंतर अधिकाऱ्यांनी नाकारले. पहिल्या प्रकरणात 16 ऑक्टोबर रोजी बंगळुरुला जाणाऱ्या अकासा विमानाला निशाणा बनवले होते. एक्सवरून मिळालेल्या धमकीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या विमानात 180हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. विमानाला दिल्लीला परतावे लागले होते. पोलिसांनी दुसऱ्या दिवशी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सला मेसेज लिहून धमकीचे मेसेज पोस्ट अकाऊंटचे डिटेल्स मागितले होते.
दिल्ली पोलीसांची सायबर सेलचे विविध पथक विमानांना मिळणाऱ्या धमक्यांसंदर्भात एक्स आणि अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. एका आठवड्यात 170 हून अधिक विमानांना बॉम्बने उडविण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या. दरम्यान, सरकार विमान कंपन्यांना धमक्यांचा सामना करण्यासाठी कायदेशीर कारवाईची योजना आखत आहे. ज्यामध्ये गुन्हेगारांना नो फ्लाईट लिस्टमध्ये टाकण्याचा समावेश असेल.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List