Maharashtra Assembly Election 2024 – शिवसेनेच्या 65 शिलेदारांची घोषणा, आदित्य ठाकरे वरळीतून तर मिंध्यांविरोधात केदार दिघे लढणार!

Maharashtra Assembly Election 2024 – शिवसेनेच्या 65 शिलेदारांची घोषणा, आदित्य ठाकरे वरळीतून तर मिंध्यांविरोधात केदार दिघे लढणार!

विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने आज शिवसेनेने आपल्या 65 शिलेदारांची पहिली यादी जाहीर केली. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना शिवसेनेने वरळी मतदारसंघातून दुसऱयांदा निवडणूक रिंगणात उतरवले आहे, तर दिवंगत आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भिडणार आहेत. पहिल्यांदाच निवडणूक लढवणारे शिवसेना व युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांना वांद्रे पूर्व मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेनेने जाहीर केलेल्या पहिल्या यादीमध्ये बहुतांश विद्यमान आमदारांचा समावेश आहे.

महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला आज निश्चित झाला. त्यानंतर शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून 65 उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्धीस देण्यात आली. त्यात तगडे उमेदवार देण्यात आले आहेत. शिवसेनेने माहीम मतदारसंघातून महेश सावंत यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. ठाणे – राजन विचारे, दिंडोशी -सुनील प्रभू, विक्रोळी -सुनील राऊत, कलिना-संजय पोतनीस तर नेवासा मतदारसंघातून शंकरराव गडाख यांना तिकीट देण्यात आले आहे.

चाळीसगाव – उन्मेष पाटील, पाचोरा – वैशाली सूर्यवंशी, मेहकर (अजा) – सिद्धार्थ खरात, बाळापूर – नितीन देशमुख, अकोला पूर्व – गोपाल दातकर, वाशीम (अजा) – डॉ. सिद्धार्थ देवळे, बडनेरा – सुनील खराटे, रामटेक – विशाल बरबटे, वणी – संजय देरकर, लोहा-एकनाथ पवार, कळमनुरी – डॉ. संतोष टारफे, परभणी – डॉ. राहुल पाटील, गंगाखेड – विशाल कदम, सिल्लोड – सुरेश बनकर, कन्नड- उदयसिंह राजपूत, संभाजीनगर मध्य – किशनचंद तनवाणी, संभाजीनगर प. (अजा) – राजू शिंदे, वैजापूर – दिनेश परदेशी, नांदगांव – गणेश धात्रक, मालेगांव बाह्य – अद्वय हिरे, निफाड – अनिल कदम, नाशिक मध्य – वसंत गीते, नाशिक पश्चिम – सुधाकर बडगुजर, पालघर (अज) – जयेंद्र दुबळा, बोईसर (अज) – डॉ. विश्वास वळवी, भिवंडी ग्रामीण (अज) – महादेव घाटळ, अंबरनाथ (अजा) – राजेश वानखेडे, डोंबिवली – दीपेश म्हात्रे, कल्याण ग्रामीण – सुभाष भोईर, ओवळा-माजिवडा – नरेश मणेरा, कोपरी-पाचपाखाडी – केदार दिघे, ठाणे – राजन विचारे, ऐरोली – एम.के. मढवी, मागाठाणे – उदेश पाटेकर, विक्रोळी – सुनील राऊत, भांडुप पश्चिम – रमेश कोरगावकर, जोगेश्वरी पूर्व – अनंत (बाळा) नर, दिंडोशी – सुनील प्रभू, गोरेगाव – समीर देसाई, अंधेरी पूर्व – ऋतुजा लटके, चेंबूर – प्रकाश फातर्पेकर, कुर्ला (अजा) – प्रवीणा मोरजकर, कलिना -संजय पोतनीस, वांद्रे पूर्व – वरुण सरदेसाई, माहीम – महेश सावंत, वरळी – आदित्य ठाकरे, कर्जत – नितीन सावंत, उरण – मनोहर भोईर, महाड – स्नेहल जगताप, नेवासा – शंकरराव गडाख, गेवराई – बदामराव पंडित, धाराशीव – पैलास पाटील, बार्शी – दिलीप सोपल, सोलापूर दक्षिण – अमर रतिकांत पाटील, सांगोले – दीपक आबा साळुंखे, पाटण – हर्षद कदम, दापोली – संजय कदम, गुहागर – भास्कर जाधव, रत्नागिरी – सुरेंद्रनाथ (बाळ) माने, राजापूर – राजन साळवी, कुडाळ – वैभव नाईक, सावंतवाडी – राजन तेली, राधानगरी – के. पी. पाटील, शाहूवाडी – सत्यजीत आबा पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आधी शरद पवारांबाबत वादग्रस्त विधान, आता सदाभाऊंची राष्ट्रवादीवर सडकून टीका आधी शरद पवारांबाबत वादग्रस्त विधान, आता सदाभाऊंची राष्ट्रवादीवर सडकून टीका
महायुतीतील नेते सदाभाऊ खोत यांनी काल शरद पवार यांचं आजारपण आणि शारिरिक व्यंगावर टीका केली. त्यांच्या या विधानाने वाद निर्माण...
सलमान खाननंतर बॉलिवूडच्या आणखी एका मोठ्या सुपरस्टारला जीवे मारण्याची धमकी
‘आई कुठे काय करते’ मधील अनिरुद्ध साकारताना…; मिलिंद गवळींनी व्यक्त केली मनातील खंत
भारतीय निर्मातीने विकत घेतलं Friends फेम मॅथ्यू पेरीचं घर; हिंदू पद्धतीनुसार केली पूजा
Aishwarya Rai – Abhishek Bachchan : ऐश्वर्या-अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान मोठी अपडेट, दोघं पुन्हा एकत्र येणार ?
बस चालवता, चालवता ड्रायव्हर अचानक हार्ट अटॅकने कोसळला, मग…VIDEO
अजित पवारांचा भाजपला ठेंगा, नवाब मलिक यांचा प्रचार करणार!