Jammu-Kashmir : गांदरबलमध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याचे छायाचित्र आले समोर, साथीदारांचाही शोध सुरू
जम्मू-काश्मीरमधील गांदरबल येथे कामगारांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याचे छायाचित्र समोर आले आहे. हातात बंदूक घेऊन गांदरबल परिसरात प्रवेश करताना दहशतवादी सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सुरक्षादलांनी दहशतवाद्याचे छायाचित्र शेअर केले आहे. सुरक्षा दलाकडून सदर दहशतवाद्याच्या अन्य साथीदारांचाही शोध सुरू आहे.
गांदरबल जिल्ह्यातील गगनगीर भागात रविवारी रात्री दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात एका डॉक्टरसह पाच कामगारांचा मृत्यू झाला होता. तर पाच कामगार गंभीर जखमी झाले होते. जखमी कामगारांना उपचारासाठी श्रीनगरमधील शेर-ए-काश्मीर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (SKIMS) येथे दाखल करण्यात आले.
सर्व कामगार मेसमध्ये जेवणासाठी एकत्र आले होते. त्यावेळी तीन दहशतवादी तेथे आले आणि त्यांनी कामगारांच्या गटावर अंदाधुंद गोळीबार केला. दहशतवाद्यांच्या गोळीबारात दोन वाहनेही जळून खाक झाली. गुरमीत सिंग, डॉ. शाहनवाज, मोहम्मद हनिफ, अनिल कुमार शुक्ला, फहीम नसीर, कलीम, शशी अब्रोल अशी हल्ल्यात मयत झालेल्यांची नावे आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List