अभिषेक बच्चनसोबत अफेअरची चर्चा, अभिनेत्री प्रेमाबद्दल म्हणाली होती, ‘तो विवाहित असून…’

अभिषेक बच्चनसोबत अफेअरची चर्चा, अभिनेत्री प्रेमाबद्दल म्हणाली होती, ‘तो विवाहित असून…’

Abhishek Bachchan Love Life: अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्यासोबत घटस्फोटाच्या चर्चा रंगत असताना अभिनेता अभिषेक बच्चन याच्या अफेअरची चर्चा अभिनेत्री निम्रत कौर हिच्यासोबत रंगत आहे. निम्रत आणि अभिषेक बच्चन यांनी ‘दसवी’ सिनेमात एकत्र स्क्रिन शेअर केली होती. सिनेमात निम्रत, अभिषेकच्या पत्नीच्या भूमिकेत होती. सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला होता. एक्स-बॉयफ्रेंडबद्दल बोलताना निम्रत ‘त्याचं लग्न झालं आहे आणि तो बाप देखील झाला आहे…’ असं म्हणाली होती. अभिनेत्रीच्या वक्तव्यावर अभिषेक देखील हैराण झाला होता.

अभिषेक – निम्रत स्टारर ‘दसवी’ सिनेमा 2022 मध्ये प्रदर्शित झाला होता. सिनेमाच्या प्रमोशन दरम्याल निम्रत हिला तिच्या खासगी आयुष्याबद्दल विचारण्यात आलं होतं. यावर अभिनेत्री म्हणाली होती, ‘मी माझ्या भूतकाळाबद्दल फार काही सांगणार नाही. कारण तो मुलगा आता विवाहित आहे आणि त्याला मुलं देखील आहेत. त्यामुळे मी काही त्याबद्दल बोललेलं योग्य ठरणार नाही.’

पुढे मुलाची ओळ्ख लपवत निम्रत म्हणाली, ‘तो प्रचंड अभ्यासू होता आणि थोडा लाजाळू… खूप प्रेमळ होता. पण थोडा वाईट देखील होता. तो कायम माझी केमिस्ट्रीमध्ये मदत करायचा…’ यावर अभिषेत विनोदी अंदाजात म्हणाला, ‘तो तुझा शिक्षण होता का?’

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Nimrat Kaur (@nimratofficial)

 

यावर निम्रत म्हणाली, ‘नाही… तो माझी शिक्षक नव्हता. तो फक्त माझी केमिस्ट्रीमध्ये मदत करायचा…’, निम्रतला नातं लग्नापर्यंत का नाही पोहोचलं? असा प्रश्न देखील विचारण्यात आला. यावर अभिनेत्री म्हणाली, ‘अनेकांच्या मते मी नातं निभावलं नाही…’ अभिषेक चकित झाला आणि म्हणाला, ‘भगवान! चांगलं आहे…’

निम्रत हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने ‘द लंचबॉक्स’ सिनेमा आणि ‘होमलँड, ‘वेवार्ड पाइंस’ यांसारख्या अमेरिकन सीरिजमध्ये काम केलं आहे. ‘एयरलिफ्ट’ आणि ‘दसवी’ सिनेमातील अभिनेत्रीचं काम देखील चाहत्यांना प्रचंड आवडलं. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री सक्रिय असते.

अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर. वयाच्या 42 व्या वर्षी देखील निम्रत अविवाहित आहे. निम्रत हिचं नाव माजी भारतीय क्रिकेटर रवी शास्त्री यांच्यासोबत जोडण्यात आलं. दोघांनी एकमेकांना 2 वर्ष डेट केल्याची देखील माहिती समोर येत आहे. तर अभिषेक यांने 2007 मध्ये ऐश्वर्या रायसोबत लग्न केलं. 2011 मध्ये ऐश्वर्या – अभिषेक यांना आराध्याचं जगात स्वागत केलं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

रस्त्यावरील खाद्यविक्रेत्यांना अन्न सुरक्षा, स्वच्छतेचे धडे! मुंबईकरांना मिळणार स्वच्छ, ताजे खाद्यपदार्थ रस्त्यावरील खाद्यविक्रेत्यांना अन्न सुरक्षा, स्वच्छतेचे धडे! मुंबईकरांना मिळणार स्वच्छ, ताजे खाद्यपदार्थ
मुंबईकरांना दूषित अन्न सेवनापासून परावृत्त करून आरोग्यदायी अन्न देण्यास प्रवृत्त करण्यासाठी सुमारे 10 हजार परवानाधारक खाद्यविव्रेत्यांना अन्न सुरक्षा नियम, अन्न...
पूजा खेडकरला अटक होणार, दिल्ली हायकोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
परप्रांतीय रिक्षाचालकांवर तातडीने कारवाई करा! शिवसेनेची विलेपार्ले पोलिसांकडे मागणी 
वांद्रे येथील भारतीय विमा संस्थानात वेतनवाढ करार; भारतीय विमा कर्मचारी सेना महासंघाच्या पाठपुराव्याला यश 
‘म्युच्युअल फंड सही है’ जाहिरातीविरुद्ध याचिका
सनी लिओनी घेत होती सरकारी योजनेचा लाभ
दहशतवाद्यांच्या साथीदाराला मुंबईतून ठोकल्या बेड्या