आमदार सुहास कांदे यांच्या विरोधात अजित पवार गट आक्रमक
महायुतीत नांदगाव-मनमाड मतदारसंघात मिंधे गट आणि अजित पवार गटातील वाद विकोपाला पोहचला आहे. मिंधे गटाचे विद्यमान आमदार सुहास कांदे यांच्या विरोधात अजित पवार गटाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहे. एक तर या मतदारसंघातून निवडणूक लढवा नाही तर शिंदे गटाचा उमेदवार बदला, अशी मागणी अजितदादा गटाच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
नांदगाव-मनमाड विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदारांच्या उमेदवारीला विरोध करत अजित पवार गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी आज थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मुंबईतील देवगिरी शासकीय निवासस्थान गाठत कैफियत मांडली. जवळपास 200 हून अधिक कार्यकर्ते देवगिरी या निवासस्थानी दाखल झाले. नांदगावची जागा मिळावी अथवा येथील शिंदे गटाचा उमेदवार बदलावा अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. विद्यमान आमदार सुहास कांदेंना उमेदवारी दिली तर आम्ही महायुतीचे काम विधानसभा निवडणुकीत करणार नाही, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी अजितदादांसमोर मांडली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List