धारावीच्या मस्जिदमधील बेकायदा बांधकाम हटवण्यास सुरुवात, पाच दिवसांत काम पूर्ण करणार
धारावीमधील एका मस्जिदमध्ये झालेले बेकायदा बांधकाम पालिकेच्या आदेशानंतर संबंधित ट्रस्टकडून हटवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. धारावीमधील काळा किल्लाजवळ महबुबे सुबनिया मस्जिदमधील बेकायदा बांधकामप्रकरणी पालिकेने नोटीस बजावली होती. पालिकेने केलेल्या कारवाईला मुस्लिम बांधवांकडून जोरदार विरोध करण्यात आला होता. मात्र ही मस्जिद पाच पह्टो पासवर घरावर बनवल्याप्रकरणी अवैध बांधकाम ठरवण्यात आले होते. त्यामुळे हे बांधकाम तोडणे संबंधित ट्रस्टला अनिवार्य ठरले आहे. यानुसार मस्जिद ट्रस्टकडून बेकायदा बांधकाम तोडण्यास सुरुवात करण्यात आली असून हे काम पाच दिवसांत पूर्ण होणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List