ढाणकीत शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपला केला रामराम; हाताला बांधले शिवबंधन

ढाणकीत शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपला केला रामराम; हाताला बांधले शिवबंधन

>> प्रसाद नायगावकर

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात प्रत्येक पक्ष तयारीला लागले आहेत. तसेच भाजपतील अनेक आमदार, नेते पक्षाला रामराम करत घरवापसी करत आहेत. यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड तालुक्यात ढाणकी येथे भाजपला मोठा धक्का बसला आहे. शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी भाजपला रामराम करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षात प्रवेश केला आहे. शिवसेनेत शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला आहे.

विधानसभा निवडणुकीआधी भाजपला धक्के बसत आहेत. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणातून जनमत महाविकास आघाडीच्या बाजूने असल्याचे दिसून आले आहे. तसेच अनेक आमदार, नेते यांनाही जनमताचा कौल दिसून येत असल्याने अनेकजण भाजपला रामराम करत स्वगृही परतत आहेत. या शिवबंधन कार्यक्रमासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे,युवासेना जिल्हाप्रमुख विशाल पांडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शाखा भरवाडे,शिवसेना विधानसभा प्रमुख भीमराव भालेराव,संपर्क प्रमुख अॅड.बळीराम मुटकुळे,राजू खामणेकर,सतीश नाईक,संजय कुंभरवार,गणेश नरवाडे,रमेश गायकवाड,रमेश पराते,एजाज पटेल,नितिन शिंदे,शिवाजी फाळके,रमेश होले,कांता वासमवार दिलीप नंदनवार यासह शिवसेना यूवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रवेशासाठी विशेष संघटनात्मक काम शहर प्रमुख बंटी जाधव व युवासेना तालुकाप्रमुख संभाजी गोरटकर यांनी संघटन वाढीसाठी विशेष प्रयत्न केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

घोर फसवणूक… मिठागरांच्या जमिनीही अदानीच्या घशात, 255 एकर जमिनीचा जम्बो घोटाळा घोर फसवणूक… मिठागरांच्या जमिनीही अदानीच्या घशात, 255 एकर जमिनीचा जम्बो घोटाळा
धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली धारावीतील रहिवाशांची मिंधे सरकारकडून घोर फसवणूक सुरू आहे. धारावीकरांचे आहे त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्याचे सोडून त्यांना मुंबई...
गुजरातमध्ये नोटांवर गांधीजींऐवजी अनुपम खेर यांचे चित्र, नकली नोटांच्या बदल्यात दीड कोटीचे सोने लुटले
देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा, सर्वोच्च न्यायालयाने चंद्राबाबू नायडू यांना फटकारले
बदलापुरात एकही पुतळा न उभारलेल्या नवख्या शिल्पकाराला शिवरायांच्या पुतळ्याचे कंत्राट,भाजप नगरसेवकाच्या हट्टापोटी 95 लाखांचा खुर्दा
निर्मला सीतारामनकिरुद्ध तपासास कर्नाटक हायकोर्टाची स्थगिती
सामना अग्रलेख – गडकरींचे ‘सत्य’कथन
मराठा-कुणबी आरक्षणासंदर्भात शिंदे समितीचा अहवाल स्वीकारला