चांगला स्ट्राईक रेट याचा अर्थ हा नाही की….शरद पवार यांच्या वक्तव्यावर संजय राऊत यांनी स्पष्टच सांगितले
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकांचे बिगुल वाजले आहे. सर्व पक्षांनी आपण किती जागा लढवायच्या याची चाचपणी सुरु केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत खलबते सुरु आहेत. महायुतीला लोकसभा निवडणूकांत फटका बसवल्याने आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिंतन सुरु केले आहे. त्यातच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या बांद्यावर जाऊन बैठका घेणेही सुरु केले आहे. शरद पवार यांनी विधानसभेच्या 100 जागा लढविण्याचे वक्तव्य केले आहे. यावरुन शिवसेना उद्धव ठाकरे गटाने नेते संजय राऊत यांनी असहमती व्यक्त केली आहे. संजय राऊत यांनी जागा वाटपावर अजून काही ठरलेले नाही सर्व काही 25 जूननंतर ठरेल असे म्हटल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
शरद पवार हे महाविकास आघाडीचे आधारस्तंभ आहेत आणि मार्गदर्शक आहेत. परंतू अजून जागावाटपाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. या आघाडीत सर्व बरोबरचे सहकाही आहे. लोकसभा निवडणूका सर्वांनी एकत्र मिळून लढून जिंकल्या आहेत. आमच्यात लवकरच चर्चा सुरु होणार आहे. 25 जूनला आमची एकत्र बैठक होईल असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
25 जूनला दिल्लीत बैठक
दिल्लीत 25 जूनला इंडिया आघाडीची एक महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत जागावाटपाची देखील चर्चा होणार आहे. यावेळी शरद पवार साहेबांचा स्ट्राईक रेट जरूर चांगला आहे. परंतू त्याचा अर्थ असा नाही की त्यांनी जादा जागा लढाव्यात. यावेळी शिवसेनेस जास्त टार्गेट करण्यात आले. आमच्या मुंबईच्या जागेवर डाका घातला. कोणालाच जागा कमी मिळाल्या नाहीत. आम्ही मान्सून अधिवेशनानंतर एकत्र बसून चर्चा करु असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
पुण्यात शरद पवार यांची बैठक
पुणे शरद पवार यांनी आपल्या पक्ष कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली आहे. या बैठकीत पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख प्रशात जगताप यांनी सांगितले की शरद पवार यांनी या विधानसभा निवडणूकीत संपूर्ण ताकदीने उतरण्याचे संकेत दिले आहेत. पक्ष आता अधिक आक्रमक धोरण स्वीकारणार आहे.लोकसभा निवडणूकात राष्ट्रवादी उबाठा आणि कॉंग्रेसच्या तुलनेत कमी जागा लढविण्यास तयार झाली होती. परंतू आता विधानसभा निवडणूकात हे धोरण चालणार नसल्याचे प्रशांत जगताप यांनी सांगितले.
लोकसभेत विजयाने उत्साह वाढला
लोकसभा निवडणूका महाविकास आघाडीतील घटकपक्षाने एकत्र येत लढा दिला होता. इंडिया आघाडीच्या फॉर्मुल्यानूसार उद्धव ठाकरे गटाने सर्वाधिक 21 जागांवर निवडणूक लढली. त्यांना 9 जागांवर विजय मिळाला. तर कॉंग्रेसला सर्वाधिक 13 जागांवर विजय मिळाला. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने 8 जागांवर विजय मिळविला आहे. उद्धव ठाकरे गटाचा स्ट्राईक रेट कमी होता. कॉंग्रेसला मोठा विजय मिळाला. त्यांना केवळ चार जागा गमवाव्या लागल्या. तर शरद पवार यांनी 2 जागांचे नुकसान झाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List