मुंबईत पुन्हा सेलिब्रिटीचा गेम? बिश्नोई गँगशी काय कनेक्शन, पोलिसांचा तो मोठा खुलासा काय
बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्यासह इतर काही जण लॉरेन्स बिश्नोई गँगच्या हिटलिस्टवर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर ही गँग अजून मोठे कांड करण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले आहे. मुंबई पोलिसांच्या हाती याविषयीचे मोठे धागेदोरे हाती लागले आहे. त्यांनी याविषयीचा मोठा खुलासा केला आहे. त्यामुळे पु्न्हा भीतीचे सावट उभे ठाकले आहे. पोलिसांसमोर बिश्नोई गँगचे मोठे आव्हान असल्याचे समोर येत आहे.
पाच शूटरला केली होती अटक
मुंबई पोलिसांनी अंधेरी परिसरातून काही दिवसांपूर्वी पाच शूटरला अटक केली होती. त्यात एक आरोपी बिस्नोई गँगच्या संपर्कात असल्याचा तपासात खुलासा झाला होता. या पाच आरोपींकडून पोलिसांनी सात बंदुक आणि 21 जिवंत काडतुस जप्त केले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एक आरोपी विकास ठाकुरने चौकशी दरम्यान खुलासा केला आहे की तो बिश्नोई गँगच्या संपर्कात होता.
तो खुलासा काय?
लॉरेन्स बिश्नोई चा भाऊ अनमोल बिश्नोई याच्या आदेशानंतर हे पाच शूटर मुंबईत आले होते का? याचा तपास पोलीस करत आहेत. मुंबईत त्यांना एक मोठा कॉन्ट्रॅक्ट देखील भेटलं होतं. मुंबईमध्ये दाखल झाल्यानंतर कोणावर हल्ला करायचा आहे त्या संदर्भात माहिती गँगकडून भेटणार होती. मात्र त्याआधीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
या हल्ल्यानंतर या पाच जणांना 50 लाख रुपये देण्याचा आश्वासन देखील दिला गेला होता ,मात्र ही सुपारी त्यांना कोणी दिली याचा खुलासा अद्याप झालेला नाही/ या हल्ल्यात मुंबईतील एका मोठ्या व्यापारीचा खून होणार होता मात्र त्या आधी पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या.
या पाच जणांना अटक
विकास ठाकूर उर्फ विक्की, सुमित कुमार दिलावर, श्रेयस यादव, देवेंद्र सक्सेना आणि विवेक गुप्ता या पाच जणांना पोलिसांनी अटक केली. हे आरोपी राजस्थान, बिहार आणि उत्तर प्रदेशातील रहिवासी आहेत. सुमित कुमार आणि विकास हे हिस्ट्रीशीटर आहेत. लॉरेन्स गँगकडून अभिनेता सलमान खान याला सातत्याने धमक्या देण्यात येत आहे. त्यामुळे या पाच जणांची अटक होणे आणि त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्र जप्त करण्यात आले आहे. त्यामुळे व्यापारी आणि सेलिब्रिटींच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List