12 पुरुषांसोबत अफेअर, 49 वर्षीही सिंगल; या बॉलिवूड अभिनेत्रीच्या सौंदर्य अन् फिटनेसचे सगळेच फॅन
हिंदी चित्रपटसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांच्यावर वयाचा परिणाम दिसून येत नाही. अगदी 50 व्या वर्षीही हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेत्री तरुण आणि सुंदर दिसतात. बॉलिवूडमधील अशीच एक अभिनेत्री आहे जी तिच्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्यासाठी आणि तिच्या ग्लॅमरसाठी ओळखली जाते. सोबतच ही अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहिली आहे. तिच्या अफेअर्सबद्दलही अनेकदा चर्चा होताना दिसते.
49 व्या वर्षीही अभिनेत्री सौंदर्याने आणि अद्भुत फिटनेसने चाहत्यांच्या मनावर राज्य करते
ही अभिनेत्री आजही 49 व्या वर्षीही तिच्या सौंदर्याने आणि अद्भुत फिटनेसने चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. अभिनेत्री तिच्या ग्लॅमरस स्टाईलसह फिटनेसने चाहत्यांना थक्क करते. ही प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आहे सुष्मिता सेन. सुष्मिता आता चित्रपटांमध्ये सक्रिय नसली तरी, ती सोशल मीडियावर तिच्या सर्व चाहत्यांशी जोडलेली राहते.
सुष्मिता दररोज तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. यामध्ये, 49 वर्षीय सुष्मिता अनेकदा तिच्या फिटनेस आणि ग्लॅमरस स्टाईलने तिच्या चाहत्यांना कमेंट आणि लाईक करण्यास भाग पाडते. सुष्मिताचा जन्म 19 नोव्हेंबर 1975 रोजी हैदराबाद येथे झाला. इंस्टाग्रामवर त्याचे 75 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
चित्रपटांमुळेच नव्हे तर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही बरीच चर्चा
सुष्मिताने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच इतिहास रचला आणि जगभर आपले नाव प्रसिद्ध केले. अभिनेत्रीला 1994 मध्ये मिस युनिव्हर्सचा किताब मिळाला होता. हा किताब जिंकणारी ती पहिली भारतीय ठरली. मिस युनिव्हर्स झाल्यानंतर सुष्मिता बॉलिवूडकडे वळाली. तिचा पहिला चित्रपट ‘दस्तक’ 1996 मध्ये प्रदर्शित झाला.
12 पुरुषांसोबत अफेअर
सुष्मिताच्या केवळ तिच्या चित्रपटांमुळेच नव्हे तर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही बरीच चर्चा रंगली. तिचे नाव चार-पाच नव्हे तर 12 पुरूषांशी जोडले गेले आहे.
सुष्मिता सेनचे 12 जणांसोबत अफेअर होते. यामध्ये विक्रम भट्ट, रोहमन शॉल, संजय नारंग, रणदीप हुड्डा, हृतिक भसीन, वसीम अक्रम, इम्तियाज खत्री आणि ललित मोदी अशी अनेक नावे आहेत. पण सुष्मिताने कोणाशीही लग्न केले नाही. वयाच्या 49 व्या वर्षीही ती अजूनही सिंगल आहे. पण तिने दोन मुलींना दत्तक घेतलं आहे. ती एक उत्तम आई आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List