गर्लफ्रेंडला घेऊन पूर्व पत्नीच्या घरी पोहोचला आमिर खान; नेमकं काय शिजतंय?
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खान त्याच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत आहे. आमिरच्या आयुष्यात तिसऱ्यांदा प्रेमाची एण्ट्री झाली आहे. आपल्या 60 व्या वाढदिवशी त्याने सर्वांसमोर गर्लफ्रेंडची ओळख करून दिली होती. बेंगळुरूच्या गौरी स्प्रॅटला आमिर डेट करतोय. माध्यमांसमोर प्रेमाची जाहीर कबुली दिल्यानंतर आमिर त्याच्या गर्लफ्रेंडसोबत ‘खुल्लम खुल्ला’ प्रेम करताना दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी या दोघांनी पारंपरिक वेशभूषेत एका फिल्म फेस्टिव्हलला हजेरी लावली होती. त्यानंतर नुकतंच या दोघांना आमिरच्या पूर्व पत्नीच्या घराबाहेर पाहिलं गेलं. विशेष म्हणजे यावेळी आमिर आणि त्याची पहिली पत्नी रिना दत्ताचा मुलगा जुनैदसुद्धा त्यांच्यासोबत होता.
सोशल मीडियावर आमिर आणि गौरीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आमिर त्याची गर्लफ्रेंड गौरी आणि मुलगा जुनैदसोबत पूर्व पत्नी रिना दत्ताच्या घराबाहेर दिसत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘सगळ्यात हटके फॅमिली’ असं एकाने लिहिलं. तर ‘इतके मोकळे विचार कुठून येतात’, असा सवाल दुसऱ्या युजरने केला. ‘मुलगा लग्नाच्या वयात आलाय आणि बाप अजूनही गर्लफ्रेंडसोबत फिरतोय’ अशीही टीका नेटकऱ्यांनी केली आहे.
आमिर खानने त्याच्या 60 व्या वर्षी गर्लफ्रेंडची सर्वांना ओळख करून दिली होती. दोनदा लग्न आणि दोनदा घटस्फोट झाल्यानंतर आमिर आता त्याची मैत्रीण गौरी स्प्रॅटला डेट करत आहे. आमिर आणि गौरी हे दोघं गेल्या 25 वर्षांपासून एकमेकांना ओळखत आहेत आणि गेल्या 18 महिन्यांपासून ते एकमेकांना डेट करत आहेत. गौरी ही बेंगळुरूची असून तिथे तिचं सलॉन आहे. लिंक्ड इन प्रोफाइवरील माहितीनुसार, गौरीने ब्लू माऊंटन स्कूलमधून शिक्षण घेतलंय. त्यानंतर तिने लंडनमध्ये एफडीए स्टायलिंग आणि फोटोग्राफी फॅशनचा कोर्स केला. तिचं मुंबईतही ‘बी ब्लंट’ नावाने सलॉन आहे. गौरीला सहा वर्षांचा मुलगासुद्धा आहे.
आमिर आणि गौरीच्या वयात बरंच अंतर आहे. आमिर 60 वर्षांचा असून गौरी सध्या 46 वर्षांची आहे. म्हणजेच या दोघांमध्ये जवळपास 14 वर्षांचं आहे. आमिरला पहिल्या दोन लग्नापासून तीन मुलं आहेत. आयरा, जुनैद आणि आझाद अशी त्यांची नावं आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List