शेजाऱ्याच्या अंडरगारमेंटमध्ये गुपचूप ही वस्तू टाकायचे… परेश रावल यांच्या या खोडी माहिती आहेत का?
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते परेश रावल यांनी आपल्या कसदार अभिनयाने बॉलिवूडवर अधिराज्य गाजवलं आहे. चरित्र नायक असो, व्हिलन असो की कॉमेडी भूमिका असो, परेश रावल यांच्या प्रत्येक भूमिका या संस्मरणीय ठरल्या आहेत. आपल्या अनोख्या आणि कसदार अभिनयाने त्यांनी बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. मोठ्या पडद्यावर अत्यंत ताकदीने वावरणारे परेश रावल हे लहाणपणी प्रचंड खोडकर होते. त्यांना सुरुवातीपासून क्रिकेट प्रचंड आवडायचं. ते उत्तम क्रिकेटही खेळायचे. त्यांच्या या क्रिकेट खेळाचा त्यांच्या शेजाऱ्यांना नेहमीच त्रास व्हायचा. शेजारी त्यांच्या खेळण्यावर वैतागायचे. त्यामुळे परेश रावल त्याचा बदला म्हणून असं काही करायचे की शेजारी थयथय नाचायचे. एका मुलाखतीत परेश रावल यांनीच हा खुलासा केला आहे.
परेश रावल यांनी लल्लन टॉपला मुलाखत दिली आहे. त्यात त्यांनी आपल्या लहानपणीचे अनेक किस्से शेअर केले आहेत. आपल्या खोडकर स्वभावाचे किस्सेही सांगितले आहेत. तसेच सिनेमा, राजकारण, थिएटर आणि सेलिब्रिटींबाबत मनमोकळेपणे भाष्य केलं आहे. शाळेत असताना मी किती दुष्ट होतो, हे मित्रच सांगतात असं ते म्हणाले. प्रत्येक मुलगा हा दुष्ट असतोच. फक्त मी पकडला जायचो इतकंच, असं परेश रावल म्हणाले.
केवळ मजाक मस्ती
त्यानंतर त्यांनी त्यांच्या लहानपणीचा एक अजब किस्सा सांगितला. मला लहानपणी क्रिकेट खेळण्याचं प्रचंड वेड होतं. मी क्रिकेट खेळत असताना शेजारी त्यावर आक्षेप घ्यायचे. मला खेळू द्यायचे नाही. त्यामुळे मी त्यांच्या अंडरगारमेंट्समध्ये खाजखुजलीची पावडर टाकून द्यायचो, असं ते म्हणाले. शेजारी दुपारी खेळू देत नव्हते. इकडे खेळू नका, असं ते सांगायचे. मी म्हणायचो, ठिक आहे. ते घराच्या बाहेर अंडरगारमेंट्स वाळत घालायचे. त्यावेळी मी त्यांच्या अंडरगारमेंट्समध्ये खाजखुजली लावायचो, असा किस्सा त्यांनी सांगितला. ही केवळ मजाक मस्ती असायची, बाकी काही नाही, असंही ते म्हणाले.
टेस्ट क्रिकेट आवडते
तुम्ही सोसायटीच्या मुलांसोबत खेळू शकत नव्हता. तुमच्या आजूबाजूला गर्दी व्हायची. तुम्हाला रुमाल बांधून खेळावं लागायचं, असं त्यांना विचारण्यात आलं. त्यावर, “हो”, असं त्यांनी उत्तर दिलं. त्याच वेळी जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की तुम्हाला क्रिकेट खूप आवडतं का? यावर त्यांनी उत्तर दिलं, “नाही यार, इतकं नाही. पण आता तर हे आयपीएल वगैरे सगळं खूप दमवणारं झालंय.” त्यानंतर त्यांना विचारण्यात आलं की पाच दिवसांचं टेस्ट मॅच आवडतं का? यावर परेश यांनी लगेच उत्तर दिलं, “हो, टेस्ट क्रिकेट ही एक कला आहे. यात इनिंगची बिल्डअप होते,” असं ते म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List