ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सरमध्ये मायक्रोआरएनएचा रोल काय? पतंजलीचा रिसर्च काय सांगतो?
ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर (TNBC) एक खतरनाक ब्रेस्ट कॅन्सर आहे. हा कर्करोग वेगाने शरीराच्या एका भागातून दुसऱ्या भागात पसरतो. त्याला नियंत्रणात ठेवणं सोपं नाहीये. या कॅन्सरमधील मायक्रोआरएनएच्या रोलबाबत पतंजली रिसर्च सेंटरने एक रिसर्च केला आहे. मायक्रोनआरएनए TNBCमध्ये मेटास्टेसिसला वाढवण्यासाठी किंवा रोखण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. काही मायक्रोआरएनए कॅन्सरच्या ट्युमरवर सप्रेसरचं काम करू शकतात आणि त्याची वाढ रोखण्यास मदत करतात, असं या रिसर्चमध्ये म्हटलं आहे.
मायक्रोआरएनएच्या आधारे ट्रीटमेंट विकसित करण्यासाठी प्रभावी पद्धतींची गरज असते. नॅनोकण आधारीत तंत्रज्ञानाने मायक्रोआरएनएला टारगेट करून TNBC सेल्सपर्यंत पोहोचवलं जाऊ शकतं. त्याच्या वाढीचं प्रमाण कमी होतं, असं या रिसर्चमध्ये स्पष्ट केलंय.
ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर काय आहे?
ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर एक ब्रेस्ट कॅन्सर आहे. यात एस्ट्रोजन रिसेप्टर, प्रोजेस्टेरोन रिसेप्टर आणि HER2 रिसेप्टर राहत नाही. या कॅन्सरमध्ये हाय हिस्टोलॉजिकल ग्रेड, दुसऱ्यांदा परत येण्याची अधिक रिस्क आणि डेथ रेट सामान्य कॅन्सरच्या तुलनेत अधिक असते. मायक्रोआरएनए ट्रिपल ब्रेस्ट कॅन्सरला शरीरातील अन्य भागात वाढण्यापासून रोखू शकलं जाऊ शकतं. मायक्रोआरएनएच्या आधारे उपचार विकसित करण्यासाठी मायक्रोआरएनएला प्रभावीपणए सेल्सपर्यंत पोहोचवणं महत्त्वाचं असतं.
मायक्रोआरएनए ट्यूमर सप्रेसर म्हणून कसे करतात काम
संशोधनात असे आढळले आहे की, मायक्रोआरएनए कर्करोगावर ऑन्कोजीन किंवा ट्यूमर सप्रेसर म्हणून काम करतात. म्हणजेच, हे कर्करोगाच्या पेशींचा प्रसार रोखतात आणि सामान्य पेशींना आरोग्यदायी ठेवतात. मायक्रोआरएनए TNBC (ट्रिपल नेगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर) वाढण्यापासूनही थांबवू शकतात. हे इपिथेलियल ते मेसेंकाइमल संक्रमण, इंट्रावासेशन, एक्स्ट्रावासेशन, स्टेम सेलचे स्थानिकरण आणि स्थलांतर यांसारख्या प्रक्रिया नियंत्रित करू शकतात.
काही आव्हानेही आहेत
संशोधनातून हे स्पष्ट झाले आहे की, मायक्रोआरएनए TNBC रोखण्यात मदत करू शकतात, मात्र काही आव्हानेही आहेत. TNBC मध्ये मायक्रोआरएनएची भूमिका समजून घेण्यासाठी आणि त्यांच्या वैद्यकीय तसेच प्रोग्नोस्टिक (आजाराची प्रगती दर्शवणारी) क्षमता उघड करण्यासाठी पुढील संशोधनाची आवश्यकता आहे. यामुळे हे स्पष्ट होईल की मायक्रोआरएनए या कर्करोगावर किती परिणामकारक आहेत आणि त्यांचा उपयोग किती आणि कशा प्रकारे करता येऊ शकतो.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List