रक्ताच्या उलट्या, अभिनेत्रीच्या आजारपणात नवऱ्याने सोडली साथ, प्रसिद्ध अभिनेत्रीचा हृदयद्रावक अंत

रक्ताच्या उलट्या, अभिनेत्रीच्या आजारपणात नवऱ्याने सोडली साथ, प्रसिद्ध अभिनेत्रीचा हृदयद्रावक अंत

झगमगत्या विश्वात अशी एक अभिनेत्री होऊन गेली जिने कमी वयात अनेक हीट सिनेमे बॉलिवूडला दिले आणि अनेक नवे विक्रम रचले. अभिनेत्रीची लोकप्रियता इतकी होती की, तिच्यासोबत काम करण्यासाठी अनेक दिग्दर्शक आणि अभिनेते रांगेत असायचे. पण अभिनेत्रीच्या मृत्यून बॉलिवूडला मोठा धक्का बसला. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री मधुबाला आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत मधुबाला यांची बहीण मधूर भूषण यांनी अभिनेत्रीच्या निधनाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

करीयरच्या शिखरावर असताना मधुबाला गंभीर आजाराच्या विळख्यात सापडल्या. 1954 साली मधुबाला यांना त्यांच्या आजाराबद्दल माहिती मिळाली. ‘बहूत दिन हुए’ सिनेमाची शुटिंग सुरु असताना मधुबाला यांना त्यांच्या आजाराबद्दल कळलं. तेव्हा त्या फक्त 30 वर्षांच्या होत्या. एक दिवस ब्रश करत असताना अचानक त्यांना रक्ताच्या उलट्या झाल्या. अशात दिलीप कुमार यांनी मधुबाला यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल केलं.

मधुबालाच्या सर्व चाचण्या झाल्या. यानंतर डॉक्टरांनी असं काही धक्कादायक सांगितलं ज्यामुळे सगळेच थक्क झाले. मधुबाला यांच्या रिपोर्टमध्ये त्यांना व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट असल्याचं उघड झालं. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर, हृदयात छिद्र… पण मधुबाला यांनी स्वतःच्या आजारावर लक्ष दिलं नाही आणि त्या काम करतच राहिल्या.

आजाराबद्दल माहिती झालं तेव्हा, मधुबाला यांचं करीयर यशाच्या शिखरावर होतं. त्यांचे एकापाठोपाठ सिनेमे हीट ठरत होते. त्यांनी स्वतःला पूर्णपणे कामात झोकून दिले आणि स्वतःचा आजार सर्वांपासून लपवून ठेवला. आजारी असूनही, मधुबालाने कारकिर्दीतील सर्वात मोठ्या सिनेमांमध्ये काम केलं, त्यापैकी एक मुघल-ए-आझममधील अनारकलीची भूमिका होती.

मधुबाला यांच्या बहिणीने सांगितल्यानुसार, सेटवर मधुबाला बेशुद्धा व्हायच्या. तरी देखील त्यांनी थांबण्याचा विचार केला नाही. त्यांना फक्त त्यांचं लक्ष्य गाठायचं होतं. शरीराने देखील साथ देणं सोडलं होतं. दिवसागणिक त्यांचा आजार वाढत होता. पण जेव्हा दिलीप कुमार यांच्यासोबत असलेलं नातं तुटलं तेव्हा त्यांना अधिक त्रास झाला.

रिपोर्टनुसार, 1960 मध्ये मधुबाला यांनी गायक किशोर कुमार यांच्यासोबत लग्न केलं. मधुबाला आणि किशोर कुमार यांच्या लग्नाला अभिनेत्रीच्या वडिलांचा विरोध होता. लग्नाच्या फक्त 10 दिवसांनंतर किशोर कुमार यांनी मधुबाला यांना उपचारासाठी परदेशात पाठवलं. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. डॉक्टरांनी देखील आजार आता बरा होऊ शकत नाही असं सांगितलं होतं. तेव्हा मधुबाला हिच्याकडे फक्त 2 वर्षांचा कालावधी होता.

सुरुवातीच्या काळात मधुबाला यांची किशोर कुमार यांनी साथ दिली. पण नंतर त्यांनी पत्नी मधुबाला यांची साथ सोडली. त्याच वेळी, किशोर कुमार व्यावसायिक गोष्टींच्या दबावाखाली होते आणि त्यामुळे ते मधुबाला यांची काळजी घेऊ शकले नाहीत. शेवटी किशोर कुमार यांनी मधुबाला यांना त्यांच्या पालकांच्या घरी सोडलं.

मधुबाला त्यांच्या शेवटच्या काळात खूप कठीण परिस्थितीतून जात होत्या. ऑक्सिजन सिलेंडर, बेशुद्धी आणि रक्ताच्या उलट्या… 1969 पर्यंत मधुबालाची प्रकृती आणखी बिकट झाली. अशा परिस्थितीत अभिनेत्रीच्या वडिलांनी किशोर कुमार यांना फोन केला.

मधुर म्हणाल्या, ‘वडिलांनी किशोर यांना बोलावून घेतलं. तेव्हा ते कोणत्या कार्यक्रमात होते. मधुबाला हिच्याकडे आता वेळ नाही, ती अखेरचे श्वास घेत आहे… असं वडिलांनी किशोर कुमार यांना सांगितलं. पण किशोर कुमार येवू शकले नाहीत…’ अखेर 23 फेब्रुवारी 1969 मध्ये मधुबाला यांनी अखेरचा श्वास घेतला. तेव्हा मधुबाला फक्त 36 वर्षांच्या होत्या.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

RR Vs GT – हेच हिंदुस्थानचं ‘वैभव’; 14 वर्षांच्या पोरांने दिग्गजांना फोडून काढलं, राजस्थानचा धडाकेबाज विजय RR Vs GT – हेच हिंदुस्थानचं ‘वैभव’; 14 वर्षांच्या पोरांने दिग्गजांना फोडून काढलं, राजस्थानचा धडाकेबाज विजय
सवाई मानसिंग स्टेडियमवर 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीच वादळ गोंगावलं आणि राजस्थानने गुजरातचा 25 चेंडू राखत 8 विकेटने पराभव केला. वैभवने...
हिंदुस्थान कधीही हल्ला करू शकतो, पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी व्यक्त केली भिती
IPL 2025 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने रचला इतिहास, 35 चेंडूत झळकावले शतक
उद्धव ठाकरेंना मुंबईत सर्वांत मोठा धक्का, बाळासाहेबांचा विश्वासू शिवसैनिक शिंदे गटात!
‘कहानी ते मर्दानी’ महिला अभिनेत्रींचा ठसा कायम, तिकीटबारीवरही खणखणाट
भाजीसाठी मोठा बटाटा घेतल्याने पतीला राग अनावर, कुऱ्हाडीने वार करत पत्नीची हत्या
कॉमनवेल्थ घोटाळ्याचा ईडी तपास बंद; दिल्ली कोर्टाने क्लोजर रिपोर्ट स्वीकारला