गोविंदा सर कुठे आहेत? विचारताच पत्नी सुनिताने केले असे हातवारे; मुलगाही झाला चकीत!

गोविंदा सर कुठे आहेत? विचारताच पत्नी सुनिताने केले असे हातवारे; मुलगाही झाला चकीत!

अभिनेता गोविंदा त्याच्या वैवाहिक आयुष्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. पत्नी सुनिता अहुजा त्याला घटस्फोट देण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं गेलं. सुनिताने काही महिन्यांपूर्वी घटस्फोटासाठी अर्जदेखील दाखल केल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी दिली होती. मात्र त्यानंतर दोघांनी लग्न वाचवण्यासाठी प्रयत्न केले. सुनिता तिच्या बेधडक स्वभावासाठी ओळखली जाते. विविध मुलाखतींमध्ये ती तिच्या खासगी आयुष्याविषयी बिनधास्तपणे व्यक्त झाली. रविवारी मुंबईतील एका फॅशन शोमध्ये तिने मुलगा हर्षवर्धनसोबत हजेरी लावली होती. यावेळी तिने मुलासोबत पापाराझींसमोर फोटोसाठी पोझसुद्धा दिले. परंतु जेव्हा एकाने तिला गोविंदाविषयी प्रश्न विचारला, तेव्हा तिची प्रतिक्रिया पाहण्याजोगी होती. तिचा हाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुलगा हर्षवर्धन अहुजासोबत रॅम्पवर फोटोसाठी पोझ देताना सुनिता यांना एका विचारलं, “गोविंदा सर कुठे आहेत?” त्यावर ती तोंड बंद करण्याचे हातवारे करते. हे पाहून बाजूला उभा असलेला मुलगा थोडा चकीत होतो आणि नंतर हसतो. हे सर्व इतक्यावरच थांबलं नाही. पापाराझी पुन्हा तिला गोविंदाविषयी प्रश्न विचारू लागतात. तेव्हा सुनिता थेट त्यांना म्हणते, “पत्ता देऊ का?”

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

सुनिताने सहा महिन्यांपूर्वी गोविंदाला घटस्फोटाची नोटीस पाठवली होती. इतकंच नव्हे तर गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळे राहत असल्याचंही सुनिताने एका मुलाखतीत म्हटलं होतं. त्यावर सुनिताने एका व्हिडीओच्या माध्यमातून स्पष्ट केलं की, “वेगवेगळे राहतो याचा अर्थ, जेव्हा गोविंदाने राजकारणात प्रवेश केला तेव्हा माझी मुलगी किशोरवयात होती. आमच्या घरात सतत पक्षाचे कार्यकर्ते ये-जा करायचे. घरात किशोरवयीन तरुणी शॉर्ट्समध्ये फिरत असेल तर ते बरं वाटत नाही. म्हणून घराच्या समोरच पक्षाच्या कामासाठी गोविंदाने ऑफिस घेतलं. अनेकदा कामामुळे आणि मिटींग्समुळे गोविंदाला रात्री खूप उशीर व्हायचा. मग तो तिथेच झोपायचा.” या व्हिडीओच्या शेवटी सुनिता असंही म्हणते, “मला आणि गोविंदाला कोणीच वेगळं करू शकत नाही. किसी का माई का लाल तो सामने आ जाए.”

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुनिताने घटस्फोटाच्या चर्चांवर आणि ट्रोलिंगवर प्रतिक्रिया दिली होती. “मी विचार करते की लोक कुत्रे आहेत, ती भुंकणारच. जोपर्यंत तुम्ही माझ्या किंवा गोविंदाच्या तोंडून काही ऐकत नाही, तोपर्यंत तुम्ही याचा विचार करू नका की काय आहे आणि काय नाही”, असं ती म्हणाली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भाजपचे बेगडी हिंदुत्व!  भाजप नेते अॅड. बाबा परुळेकर यांनी पतितपावन मंदिरात भजन करण्यास भजनी बुवांना रोखले भाजपचे बेगडी हिंदुत्व!  भाजप नेते अॅड. बाबा परुळेकर यांनी पतितपावन मंदिरात भजन करण्यास भजनी बुवांना रोखले
रत्नागिरीतील पतितपावन मंदिरात भजनासाठी गेलेल्या वयोवृद्ध भजनी बुवांना भाजपचे नेते अॅड. बाबा परुळेकर यांनी  प्रवेश नाकारत भजन करण्यास रोखले. अखेर...
मोटरमनच्या केबिनमध्ये सीसीटीव्हींचा वॉच
RR Vs GT – हेच हिंदुस्थानचं ‘वैभव’; 14 वर्षांच्या पोरांने दिग्गजांना फोडून काढलं, राजस्थानचा धडाकेबाज विजय
हिंदुस्थान कधीही हल्ला करू शकतो, पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी व्यक्त केली भिती
IPL 2025 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने रचला इतिहास, 35 चेंडूत झळकावले शतक
उद्धव ठाकरेंना मुंबईत सर्वांत मोठा धक्का, बाळासाहेबांचा विश्वासू शिवसैनिक शिंदे गटात!
‘कहानी ते मर्दानी’ महिला अभिनेत्रींचा ठसा कायम, तिकीटबारीवरही खणखणाट