“अशा व्यक्तीबद्दल मी चुकीचं ..”; 14 वर्षांनंतर प्रभूदेवाच्या पूर्व पत्नीने घटस्फोटाबद्दल सोडलं मौन
प्रभूदेवा हे कलाविश्वातील खूप मोठं नाव आहे. उत्तम डान्सर, कोरिओग्राफरसोबतच ते चित्रपट दिग्दर्शकसुद्धा आहेत. प्रभूदेवा त्यांच्या खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी 1995 मध्ये रामलथशी लग्न केलं होतं. परंतु या दोघांचा संसार फार काळ टिकला नाही. 2011 मध्ये हे दोघं विभक्त झाले.
प्रभूदेवा आणि रामलथ यांच्या घटस्फोटाला 14 वर्षे उलटली आहेत. आता इतक्या वर्षांनंतर पहिल्यांदाच प्रभूदेवाच्या पूर्व पत्नीने घटस्फोटाबाबत मौन सोडलं आहे. एका तमिळ युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत रामलथ या प्रभूदेवाबद्दल मोकळेपणे व्यक्त झाल्या.
रामलथ यांनी सांगितलं की प्रभूदेवा आजसुद्धा त्यांच्या मुलांवर खूप प्रेम करतात. ते एक उत्तम पिता आहेत. मुलांसाठी त्यांचं प्रेम अजिबात बदललं नाही. प्रभूदेवासाठी त्यांची मुलंच त्यांचं आयुष्य आणि विश्व आहे, असं त्या म्हणाल्या.
तो त्याच्या मुलांशी खूप जोडलेला आहे. ते दोघं कोणत्याही परिस्थितीत का असेना, एकमेकांसोबत बोलल्याशिवाय त्यांचा दिवस जात नाही. घटस्फोटानंतर प्रभूदेवाने माझी खूप साथ दिली. आमच्या मुलांचीही त्याने साथ दिली", असं त्यांनी पुढे सांगितलं.
प्रभूदेवाविषयी त्या म्हणाल्या, "आजसुद्धा तो वडील म्हणून त्याच्या सर्व जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये पार पाडतो. आम्ही दोघं मिळून मुलांच्या भवितव्याविषयीचे निर्णय घेतो. घटस्फोट झाला तरी तो माझ्याशी नेहमीच आदराने वागतो. माझ्याबद्दल तो कधीच कुठे नकारात्मक बोलला नाही."
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List