5 वेळा नमाज पठण करण्यापेक्षा…, मुस्लिम धर्मासंबंधित ‘तो’ प्रश्न, फराह खानचं सडेतोड उत्तर
Farah Khan on Religion: कोरियोग्राफर फराह खान (Farah Khan) कायम तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. खासगी आयुष्यामुळे देखील फराह कायम चर्चेत असते. आता देखील फहार हिने धर्माबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. फराह खान मुस्लिम आहे तर, पती शिरीष कुंदर पंजाबी आहे. दरम्यान, एका चाहत्याने फराह खानला नमाजबद्दल विचारलं की, ती खऱ्या मुस्लिमांप्रमाणे दिवसातून पाच वेळा नमाज अदा करते का? फराह खानने या प्रश्नाचे उत्तर अशा पद्धतीने दिलं की चाहते अवाक् झाले.
रेडिटवर एका चाहत्याने फराह खानला धर्माबद्दल एक प्रश्न विचारला. तू देवावर विश्वास ठेवते का? रमजानमध्ये तू रोझा ठेवते आणि नमाज अदा करता का? मला वाटतं की तुम्ही लकी अलीसारखं या सगळ्या गोष्टी करत नसाल. तो पाच वेळा नमाज अदा करतो. मला विचारायचं आहे की आपले अन्य मुस्लिम सिलेब्स शाहरुख खान, आमिर खान आणि सलमान खान धर्माबद्दल किती निष्ठा त्यांच्या मनात आहे…’
शबाना नावाच्या चाहतीच्या प्रश्नाचं उत्तर देताना कोरिओग्राफर फराह खान म्हणाली, ‘प्रिय शबाना… मी नमाज पठण करत नाही. पण मी रोझा ठेवता. शिवाय माझ्या कमाईतील काही भाग दान देखील करते. ज्याला ‘जकात’ असं म्हणतात. सोबतच मी सर्वांसोबत चांगले संबंध ठेवते. मी प्रामाणिक आहे आणि मेहनतीवर विश्वास ठेवते. दिवसातून 5 वेळा नमाज पठण करण्यापेक्षा हे योग्य आहे.’
पुढे फराह खान म्हणाली, ‘बाकी सेलिब्रिटींप्रमाणे सांगायचं झालं तर, शाहरुख खान एक चांगला व्यक्ती आहे. तो दान देखील मोठ्या प्रमाणात करतो आणि लोकांची मदत करत असतो. तो इंडस्ट्रीमधील आणि बाहेरच्या लोकांना देखील मदत करत असते.
तब्बू माझी चांगली मैत्रीण आहे. तब्बू रोज नमाज पठण करते. तिने नमाज पठण नाही केला तरी, ती चांगली व्यक्ती आहे. मला सलमान खान याच्याबद्दल माहिती आहे. पण मला माहिती आहे की तो लोकांची प्रचंड मदत करतो. मला असं वाटतं की आयुष्यात धर्मापेक्षा ही गोष्ट अधीक महत्त्वाची आहे…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त फराह खान हिने केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List