राजेश खन्ना यांचा लहान जावई आहे गडगंज श्रीमंत; करोडोंची संपत्ती, अक्षय कुमारलाही टक्कर

राजेश खन्ना यांचा लहान जावई आहे गडगंज श्रीमंत; करोडोंची संपत्ती, अक्षय कुमारलाही टक्कर

बॉलिवूडमध्ये सेलिब्रिटींच्या संपत्तीची चर्चा तर होतच असते. त्यात सुपरस्टार राजेश खन्ना, उर्फ ‘काका’ यांचाही उल्लेख येतो. राजेश खन्ना यांनी त्यांच्या काळात एकापेक्षा एक सुपरहीट चित्रपट दिले. त्यांचे चित्रपट, गाणी, ते त्यांच्या लूकपर्यंत सर्वच त्यांचे चाहते होते. त्यांनी खऱ्या अर्थाने एक रॉयल आयुष्य जगलं आहे. ते आजही अवघ्या इंडस्ट्रीसाठी प्रेरणादायक आहे. त्यांच्या चित्रपटांसोबतच वैयक्तिक आयुष्याबद्दलही तेवढीच चर्चा केली जाते. त्यांचे किस्से आजही कित्येक कलाकार सांगताना दिसतात.

एवढंच नाही तर राजेश खन्ना यांची लव्हलाईफही तेवढीच चर्चेत राहिली. त्यांचे लग्न अभिनेत्री डिंपल कपाडियाशी झाले तेव्हाही त्यांच्यातील वयाच्या अंतरावरून बरीच चर्चा रंगली होती. दरम्यान त्यांना ट्विंकल आणि रिंकी या दोन मुली देखील आहेत.

राजेश खन्नाचे लहान जावई काय करतात?  

ट्विंकल खन्ना आज लेखिका, प्रोड्यूसर आणि सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असणाऱ्या सेलिब्रिटींपैकी एक आहे. तिचं अभिनेता अक्षय कुमारशी लग्न झालं आणि तो ‘सुपरस्टार कुटुंबाचा जावई’ ठरला. पण राजेश खन्नाच्या दुसऱ्या जावयाबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे तो म्हणजे समीर सरन.

समीर सरन रिंकी खन्नाचे पती आहेत. बॉलिवूडपासून ते कोसो दूर असले तरी ते व्यवसायाच्या दुनियेत मात्र त्यांचं नाव प्रचंड आदराने घेतलं जातं. त्यांना खूप मानलं जातं. इतकंच नव्हे, तर त्यांची कमाई अक्षय कुमारच्या कमाईला टक्कर देणारी आहे. पण या गोष्टी फारशा चर्चेत येत नाहीत. 1999 साली रिंकीने ‘प्यार में कभी कभी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र हा चित्रपट आणि त्यानंतरचे तिचे काही चित्रपट म्हणावे तसे चालले नाहीत .एकामागून एक फ्लॉप सिनेमांनंतर, रिंकीने अभिनयाच्या क्षेत्रातून माघार घेतली.

Rajesh Khanna son-in-law

Rajesh Khanna son-in-law

समीर सरन आहेत मोठे बिझनेसमन 

2002 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत रिंकीने सांगितलं होतं की, डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांच्या ओळखीतून ती समीर सरन यांना भेटली. त्यांच्यात आधी मैत्री झाली आणि नंतर ती मैत्री प्रेमात बदलली. 2003 मध्ये दोघांनी लग्न केलं. त्यानंतर रिंकी लंडनमध्ये स्थायिक झाली आणि ग्लॅमरच्या दुनियेपासून कायमची दूर गेली.

लंडनमध्ये मोठ्या प्रमाणात व्यवसायाचा विस्तार

समीर सरन मूळचे कोलकात्याचे असून, भारतात अनेक शहरांमध्ये शाखा असलेल्या रिअल इस्टेट कंपनीचे पार्टनर होते. मुंबई, गोवा, कोलकाता आणि बंगळुरु यांसारख्या शहरांमध्ये त्यांचा व्यवसाय होता. आता ते लंडनमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांचा व्यवसायाचा विस्तार आहे. त्यांची अंदाजे नेटवर्थ सुमारे 250 कोटीपेक्षाही जास्त असल्याचं म्हटलं जातं.

अक्षय कुमारचं बॉक्स ऑफिसवर स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली असली तरी समीर सरन यांनी त्यांच्या क्षेत्रात मोठं नाव कमावलं आहे. राजेश खन्ना यांच्या कुटुंबातील तेही एक यशस्वी आणि संपन्न व्यक्तिमत्त्व आहेत, जे आजवर फारसं कुणाच्या नजरेस आ़ले नाही. रिंकी आणि समीरचं आयुष्य लंडनमध्ये आनंदात सुरू आहे.

 

 

 

 

 

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

गर्भवती मृत्यू प्रकरण, ससूनच्या समितीचा अहवाल सादर; दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर काय कारवाई होणार याकडे लक्ष गर्भवती मृत्यू प्रकरण, ससूनच्या समितीचा अहवाल सादर; दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर काय कारवाई होणार याकडे लक्ष
तनिषा भिसे या गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी ससून रूग्णालयाच्या समितीने चौकशी अहवाल पुणे पोलिस प्रशासन आणि वैद्यकीय शिक्षण विभागाला सादर केला...
डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून प्रसारमाध्यमांची गळचेपी
प्रभाकर पवार यांच्या ‘थरार’ पुस्तकाचे उद्या प्रकाशन, उद्धव ठाकरे, मधु मंगेश कर्णिक, संजय राऊत आदी मान्यवर उपस्थित राहणार
चेंबूर-मानखुर्द मेट्रो लवकरच प्रवाशी सेवेत, पिवळ्या मार्गिकेवर चाचणीला सुरुवात
कुणाल कामराला अटक करण्याची आवश्यकता नाही, हायकोर्टाकडून दिलासा; निकाल राखून ठेवला
ना हिंदूंचा, ना मुसलमानांचा… भाजप कुणाचाही नाही! उद्धव ठाकरे यांचा आसुड कडाडला
भाजपाध्यक्षपदासाठी दिल्लीत जोरबैठका, अमित शहा–राजनाथ यांच्यात बैठक