त्या लाडक्या बहिणींना वाऱ्यावर सोडायचं – संजय राऊतांचा सरकारवर निशाणा
एका बाजूला जागतिक बाजारात कच्च्या तेाच्या किमती खाली येत असतील तर त्याचा फायदा ग्राहकांना मिळाला पाहिजे. तो जर मिळत नसेल तर भारतासारख्या देशात निर्मला सीतारमण या महागाईमध्ये आणखी तेल ओतण्याचं काम करत आहेत. सिलेंडरच्या किंमतीत आणखी 50 रुपये वाढ झाली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींचं बजेट परत कोलमडलं. स्मृती इराणी, कंगना राणावत, भाजपच्या महिला नेत्या आहेत, त्यांना माझं आवाहन आहे, त्यांनी पुढे येऊन महिलांचं नेतृत्व करावं. हा राजकीय प्रश्न नाही, हा या देशातील गृहिणींचा जीवनमरणाचा प्रश्न आहे. युपीएचं राज्य होतं, तेव्हा याच स्मृती इराणी महागाईविरोधात महिलांचं नेतृत्व करत होत्या, रस्त्यावर सिलेंडर टाकून बसल्या होत्या. आताही या तुम्ही, सिलेंडर आम्ही पुरवून, तुम्ही फक्त आंदोलनासाठी रस्त्यावर बसायला या. असं आंदोलन शिवसेना करणार आहे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी वाढत्या महागाईवर टीका केली.
आम्हाला अर्थशास्त्र शिकवू नका, आम्हालाही ते कळतं
या देशांत प्रत्येक बाबतीत, सामान्य माणसांची, गृहिणींची लूट सुरू आहे. निवडणूक आली की लाडकी बहीणसारखी योजना आणायची, चार महिने राबवायची आणि नंतर त्या लाडक्या बहिणींनाही वाऱ्यावर सो़डायचंय, हेच सुरू आहे अशी टीकाही राऊतांनी केली.
कॅगचा रिपोर्ट आहे, एकनाथ शिंदे यांनी नगरविकास खातं कसं लुटलं, सरकारी पैशांची कशी लूट केली. मालक लूट करत आहेत, म्हणून अधिकारीही लुटायला लागले, ते स्प्ष्ट दिसतंय. शिंदेनी नगरविकास खाते कसे लुटले आहे त्याची चौकशी व्हायला पाहीजे, अशी मागणी त्यांनी केली.
ठाण्यामध्ये भाजपाचा महापौर होईल असं संजय केळकर म्हणतात तर दुसरीकडे गणेश नाईकही जनता दरबार घेतात, एकाप्रकारे एकनाथ शिंदेंची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे का असा सवाल राऊतांना विचारण्यात आला. शिंदेची कोडीं वगेरे काही नाही, त्यांचाय जो एसंशि नावाच पक्ष आहे, त्याचं काही अस्तित्व नाही. ठाण्यामध्ये विधानसभेच्या ज्या जागा जिंकल्या त्या भजपच्या मदतीने, पैशांची ताकद, ईव्हीएमचे घोटाळे, यांच्या मदतीने त्यांनी ठाण्यात त्यांच्या जागा निवडून आणल्या आहेत, असा आरोप राऊतांनी केला.
दोन दिवसांपूर्वी साताऱ्यात सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली. तिथे 4 महिन्यांपूर्वी भाजपचे आमदार मनोज घोरपडे हे बाळासाहेब पाटील यांच्यासारख्या मातब्बर नेत्याचा पराभव करून 50 हजारांच्या मताधिक्याने जिंकले. तिथेच दोन दिवसांपूर्वी सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली. तिथेच बाळासाहेब पाटील यांचं पॅनल हे मतपत्रिकेवर प्रचंड मताधिक्याने जिंकलं, तोच मतदार, तेच क्षेत्र, तीच माणसं. चार महिन्यांपूर्वीच्या निवडणुका इव्हीएमवर झाल्या, भाजप जिंकलं आणि त्याच मतदारांनी सह्याद्री साखर कारखान्याला मतदान केलं तेव्हा बळासाहेब पाटील यांचं पॅनेल 21 पैकी 21 जागा जिंकल्या. कसं परिवर्तन झालं ? याचा अर्थ ईव्हीएममध्ये घोटाळा आहे, असा आरोप राऊत यांनी केला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List