आमदार निवासातून रुग्णवाहिकेला वारंवार फोन, पण अ‍ॅम्बुलन्स न आल्याने व्यक्तीचा मृत्यू

आमदार निवासातून रुग्णवाहिकेला वारंवार फोन, पण अ‍ॅम्बुलन्स न आल्याने व्यक्तीचा मृत्यू

राज्याचा आरोग्य विभागाचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्याचा कारभार ज्या मंत्रालयातून चालतो त्याच्याजवळ असणाऱ्या आमदार निवासातही वैद्यकीय सुविधा मिळत नाही. मुंबईसारखा राजधानीच्या ठिकाणावरुन, तेही आमदार निवासातून फोन केल्यावरसुद्धा रुग्णावाहिका आलीच नाही. त्यावेळी व्यक्तीला ह्रदयविकाराच्या तीव्र वेदना होत होत्या. परंतु वेळेवर उपचार मिळाले नाही. त्यामुळे आमदार निवासात राहणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला.

अनेक फोन केल्यावर रुग्णावाहिका आली नाही

राज्यात सध्या पुणे येथील दीनानाथ रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे गर्भवती महिलाचा मृत्यू झाल्याचा प्रकार गाजत आहे. त्यानंतर आता मंत्रालय शेजारी असणाऱ्या आमदार निवासातून फोन गेल्यावरसुद्धा रुग्णवाहिका मिळत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. आकाशवाणी येथील आमदार निवासात ४०८ क्रमांकाची खोली आमदार विजयकुमार देशमुख यांना दिली आहे. त्यांच्या खोलीत सोलापूरमधील चंद्रकांत धोत्रे राहत होते. त्यांना रात्री १२.३० वाजता ह्रदयविकारच्या वेदना सुरु झाल्या. त्यामुळे रुग्णावाहिकेला वारंवार फोन करण्यात आले. त्यानंतरही रुग्णवाहिका आली नाही. शेवटी पोलिसांना फोन करावा लागला. पोलिसांच्या गाडीतून त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. परंतु रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

आमदार देशमुख यांचे कार्यकर्ते

आमदार विजयकुमार देशमुख यांचे कार्यकर्ते असलेले विशाल धोत्रे यांचे चंद्राकांत धोत्रे वडील होते. ते एका बैठकीसाठी मुंबईत आले होते. ते आकाशवाणी आमदार निवासात थांबले होते. त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर रुग्णवाहिकेला फोन केले गेले. परंतु रुग्णवाहिका आली नाही. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जात आहे.

राज्यात मुंबईसारख्या ठिकाणी रुग्णावाहिका वेळेवर येत नाही. मग ग्रामीण भागात काय परिस्थिती असणार? असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे. या प्रकरणी धोत्रे कुटुंबियाकडून कोणतीही तक्रार दिली नाही. त्यांचा मृतदेह घेऊन कुटुंबीय गावी निघाले आहेत. या प्रकारानंतर राज्यातील आरोग्य व्यवस्थेची बिकट परिस्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे.

कुटुंबियांची चौकशीची मागणी

जर आमदार निवासामध्ये वेळेत ॲम्बुलन्स आली असती तर माझ्या वडिलांना जीव गमावावा लागला नसता, असे चंद्रकांत धोत्रे यांच्या मुलाने सांगितले. ॲम्बुलन्सच्या 108 क्रमांकावर वारंवार फोन केले. मात्र ॲम्बुलन्स वेळेत आलीच नाही. त्यामुळे आमची मागणी आहे की आमदार निवासमध्ये 24 तास एक ॲम्बुलन्स असावी. या प्रकाराच्या चौकशीची मागणी धोत्रे कुटुंबियांनी केली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

चिमुकल्यावर लैंगिक अत्याचार चिमुकल्यावर लैंगिक अत्याचार
एका रेल्वे स्थानकाजवळील पटरीजवळ नेऊन साडेसहा वर्षांच्या मुलावर 22 वर्षीय तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार मध्य मुंबईत घडला. याची...
आम्ही मराठी वाचणार… शालेय विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम
एक्सप्लेनेड लिबरलला विजेतेपद
अभिनेत्याची फसवणूक; एकाला अटक
आजपासून कुमार गटाच्या 24 संघांमध्ये संघर्ष
पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी मध्य रेल्वे एक पाऊल पुढे, वर्षभरात 16 स्थानकांवर उभारले नवीन फूटओव्हर ब्रिज; मुंबईतील सात स्थानकांचा समावेश
महिला व्यावसायिकेची ऑनलाईन फसवणूक