गोविंदाच्या बायकोचा मोठा निर्णय, मुलामुलीबाबतही काय म्हटलं? अखेर ही गोष्ट घडणार
बॉलिवूड अभिनेता गोविंदा हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. त्याची पत्नी सुनिता अहूजाने घटस्फोटासाठी अर्ज केल्याचे म्हटले जात आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. आता गोविंदाच्या पत्नीने मोठा निर्णय घेतला आहे. आता तिने नेमकं काय ठरवलं आहे चला जाणून घेऊया…
सुनिता अहूजाने नुकताच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने, “या नवरात्रीत मी देवीकडे काम, नाव, कीर्ती आणि आदर मागितला आहे” असे ती म्हणाली. काम करून स्वत:साठी पैसे कमावल्याने एक वेगळीच अनुभूती मिळते असे देखील ती या मुलाखतीमध्ये बोलली. नवीन सुरुवात, तिच्या मुलांचे करिअर आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्याची तिची इच्छा याबद्दल तिने खुलासा केला. तसेच मुले मोठी होत असल्यामुळे काम मिळवून पैसे कामावण्याची इच्छा देखील व्यक्त केली.
वाचा: हा बाबासाहेबांचा संघर्ष! जय भीम, जय संविधान; गौरव मोरेच्या ‘जयभीम पँथर’चा ट्रेलर पाहिलात का?
सुनीता दिसणार रिअॅलिटी शोमध्ये
या मुलाखतीपूर्वी सुनीता अहूजा लोकप्रिय रिॲलिटी शो ‘फॅब्युलस लाइव्ह्स व्हर्सेस बॉलीवूड वाइव्हज’ च्या पुढील सीझनमध्ये दिसणार असल्याची चर्चा सुरु आहे. सूत्रांचा दिलेल्या माहितीनुसार, “आम्ही ऐकले आहे की ‘द फॅब्युलस हाऊसवाइव्हज’च्या आगामी सीझनसाठी सुनीता आहुजाला कास्ट केले जात आहे. ती अशी व्यक्ती आहे जिला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली आहे आणि तिची फॅन फॉलोइंग दिवसेंदिवस वाढत आहे. पण याबाबात कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.”
गोविंदा आणि सुनीताच्या घटस्फोटाविषयी
यावर्षी मार्चमध्ये सुनीता आहुजा तिचा पती गोविंदापासून विभक्त झाल्याच्या चर्चा सुरु आहेत. मात्र, गोविंदाच्या मॅनेजरने या सर्व अफवा असल्याचे सांगितले. ते म्हणाले, “सध्या ही बातमी सर्वत्र पसरत आहे. त्यामुळे आम्ही त्यावर लक्ष ठेवून आहोत. होय, त्यांनी न्यायालयाला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. मला याची माहिती आहे. कायदेशीर नोटीस अद्याप आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही.” गोविंदा आणि सुनीता यांचे मार्च 1987 मध्ये लग्न झाले. या जोडप्याला दोन मुले आहेत, मुलगी टीना आणि मुलगा यशवर्धन.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List