Ghibli फोटो तयार होत नाही? मग ही चूक करताय… ‘या’ टिप्स लक्षात ठेवा आणि ‘असे’ फोटो निवडा

Ghibli फोटो तयार होत नाही? मग ही चूक करताय… ‘या’ टिप्स लक्षात ठेवा आणि ‘असे’ फोटो निवडा

सध्या सगळीकडे घिबली आर्ट ॲनिमेशनने धुमाकूळ घातला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म उघडताच समोर अनेक घिबली स्टाईल फोटो पाहायला मिळतात. AI प्लॅटफॉर्म ChatGPT द्वारे जवळपास प्रत्येक व्यक्ती स्वत:च्या फोटोंचे ॲनिमेशन बनवत आहे. यापूर्वी ही सुविधा केवळ प्रीमियम वापरकर्त्यांसाठी होती. पण आता मोफत वापरकर्ते Ghibli ॲनिमेशन देखील तयार करू शकतात. पण हे फोटो तयार करत असताना अनेक समस्या देखील येत आहेत. पण तुम्ही योग्य फोटोची निवड केली तर तुमचा घिबली स्टाईल फोटो लगेच तयार होईल. यासाठी तज्ज्ञांनी काही महत्त्वाच्या टिप्स शेअर केल्या आहेत…

नेमकं काय करावं?

Ghibli फोटो करण्यासाठी तुम्ही नैसर्गिक पार्श्वभूमी असलेले फोटो निवडा. ज्यामध्ये झाडे, फुले, नदी, नाले, डोंगर अशा गोष्टींचा समावेश असेल. तज्ज्ञांच्या मते हिरवळ, आकाश किंवा सूर्यास्त यासारखे घटक घिबलीच्या रंगसंगती आणि भावनिकतेला शोभतात. Ghibli स्टाईलमध्ये प्रकाशाचा वापर अतिशय मऊ आणि स्वप्नवत असतो. त्यामिुळे भडक लाईट असलेले किंवा उन्हात काढलेले फोटो वापरणे टाळा. जर तुम्ही सौम्य फोटो वापरलेत तर Ghibli फोटो अगदी सहज आणि सुंदर होईल.

पाहा : Ghibli फोटो पाहून सिनेमाचे नाव ओळखा

फोटोचं Ghibli स्टाईलमध्ये रूपांतर करताना त्याची गुणवत्ता महत्त्वाची ठरते. कमी रिझोल्यूशनचा फोटो निवडल्यास एडिटिंगनंतर तो अस्पष्ट दिसू शकतो. त्यामुळे नेहमी हाय-क्वालिटी फोटो निवडा. हे क्वालिटी फोटो तयार झाल्यावर अतिशय सुंदर बनतात. फोटोमध्ये तीन ते चार लोक असतील तर ते फोटो टाळा. एका व्यक्तीचा शांत किंवा विचारमग्न क्षण असलेला फोटो निवडण्यावर प्रधान्य द्या. तज्ज्ञांच्या मते, Ghibli फोटो तयार करताना कोणता फोटो वापरावा हे पाहणे गरजेचे आहे.

काय आहे घिबली?

‘घिबली’ या अॅनिमेशनचा जपानशी संबंध आहे. याचे श्रेय हायाओ मियाझाकी आणि त्यांचा स्टुडिओ घिबलीला जाते. हायाओ मियाझाकी यांच्या स्टुडिओचे नाव घिबली आहे. ते या स्टुडीओचे संस्थापक आहेत. मियाझाकी हे जपानी ॲनिमेशनच्या जगाचा राजा मानले जातात. त्यांनी बनवलेले चित्रपट जगभर पसंत केले जातात. त्यांनी 25 हून अधिक ॲनिमेटेड चित्रपट आणि टीव्ही मालिका केल्या आहेत. ‘स्पिरिटेड अवे’ हा त्याचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. या चित्रपटाने जगभरात 23000 कोटींहून अधिक कमाई केली होती.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मृतांच्या टाळूवरील ‘धान्य’ खाणाऱ्या पालघरमधील रेशनधारकांना चाप बसणार, अपात्र, दुबार, स्थलांतरित, मृत व्यक्तींची नावे कट करणार मृतांच्या टाळूवरील ‘धान्य’ खाणाऱ्या पालघरमधील रेशनधारकांना चाप बसणार, अपात्र, दुबार, स्थलांतरित, मृत व्यक्तींची नावे कट करणार
अनेक रेशनधारक अपात्र, दुबार तसेच स्थलांतरित असतानाही रेशनिंगच्या धान्यावर डल्ला मारतात. इतकेच नाही तर व्यक्ती मृत झाल्यावरही त्याचे नाव रेशनकार्डवरून...
मरणानंतरही वासिंदचा प्रवीण जिवंत राहणार, मेंदूत रक्तस्राव झालेल्या प्रवीण चन्नेचे अवयव दान; अनेकांना मिळणार नवे आयुष्य
सोसायटीची जागा हडपणाऱ्या विरारच्या बिल्डरला दणका, गृहनिर्माण संस्थेच्या ‘मानीव अभिहस्तांतरणा’स मंजुरी
शाळेच्या पहिल्याच दिवशी मिळणार पाठ्यपुस्तके, अहिल्यानगर झेडपीची 23 लाख पुस्तकांची मागणी
शॉवरखाली अंघोळ नको; आठवड्यातून एकदाच कपडे धुवा ! पाणी बचतीसाठी ठाणे महापालिकेचा फॉर्म्युला
Pune crime news – नकली पिस्तूल दाखवून ज्वेलर्स शॉप लुटले, 20 ते 25 तोळ्यांचे दागिने लांबविले
पोलीस डायरी – मास्टर माइंड हेडलीच! राणा हा फुटकळ कच्चा लिंबू !