ते रेड्याचं पण दूध…, कुणाल कामरा प्रकरणावरून संजय राऊतांनी पुन्हा डिवचले

ते रेड्याचं पण दूध…, कुणाल कामरा प्रकरणावरून संजय राऊतांनी पुन्हा डिवचले

औरंगजेबाची कबर, दिशा सालियान आणि कुणाल कामरा या भोवतीच राज्यातील राजकारण गेल्या काही दिवसात फिरत आहे. या मुद्यांचे राजकीय भांडवल करण्यात येत असल्याचा आरोप विरोधक आणि सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येतो. तर खासदार संजय राऊत यांनी आज झालेल्या पत्र परिषदेत याच मुद्यावरून सत्ताधाऱ्यांना चिमटा काढला. शिंदे गटावर त्यांनी खरपूस टीका केली. त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा नियम पाळला जावा अशी मागणी केली. त्यांनी कुणाल कामरा प्रकरणावरून शिंदे गटाला चांगलाच टोला लगावला.

ते रेड्याचे दूध काढू शकतात

कुणाल कामरा याच्या विंडबन गीताने म्हणा अथवा कवितेने राज्यातील वातावरण चांगलेच तापले. त्याने शिवसेना फुटीवर केलेले भाष्य अनेकांच्या जिव्हारी लागले. त्यावरून राज्यात एकच खळबळ उडाली. कुणाल कामरा याच्याविरोधात हक्कभंग आणण्याची तयारी करण्यात येत आहे. दरम्यान या सर्व प्रकरणावर खासदार संजय राऊत यांनी टीका केली.

कुणाल कामरा याच्यावर हक्क भंग आणत असतानाच त्याचे युट्यूब चॅनलही तपासण्याची मागणी करण्यात येत असल्याच्या प्रश्नावर राऊतांनी जोरदार बॅटिंग केली. शिंदे गटाचे नेते कोणतीही मागणी करू शकतात. शिंदे गटाला मागणी करायला काहीच जात नाही. ते रेड्याचे दूध काढू शकतात आणि ते बैलाचे दूध काढू शकतात, अशी बोचरी टीका राऊतांनी केली. या देशात कायदा आहे आणि काही प्रमाणात आमच्या सारख्या लोकांनी स्वातंत्र्य टिकवून ठेवले आहे, असे राऊत म्हणाले.

त्यांना शाहांच्या पलीकडे देश दिसत नाही

हा देश खूप मोठा आहे. पण शिंदे गटाला त्यांचा देश अमित शहा यांच्या पलिकडे दिसत नाही, असा चिमटा राऊतांनी काढला. जोपर्यंत अमित शहा यांचे छत्र त्यांच्या डोक्यावर आहे, तोपर्यंत त्यांची अशी भाषा चालेल. पण रामकृष्ण ही गेले, तसे मोदी-शहा पण जातील-येतील इतके लक्षात ठेवा. इतकाच इशारा शिंदे गटाने लक्षात ठेवावा असे राऊत म्हणाले. देशात कायद्याचे राज्य आहे. शिंदे गटाने कायद्याच्या मदतीने कारवाई करावी असे ते राऊत म्हणाले.

ते राजकारण त्यांना लखलाभ

यावेळी राऊतांनी दिशा सालियान प्रकरणावर पण भाष्य केले. तो दिशा सालियान आणि यांच्या घरातला प्रश्न आहे आम्हाला त्याचं राजकारण करायचं नाही, असे ते म्हणाले. तिच्या वडीलांना हाताशी धरून जे राजकारण करत आहेत ते त्यांना लखलाभ असे ते म्हणाले. आम्ही समर्थ आहोत आदित्य ठाकरे समर्थ आहेत. या विषयाचा राजकारण करून जे या महाराष्ट्राच्या पहिल्या क्रमांकाच्या कुटुंबावर चिखल फेक करू इच्छिताच आणि पुन्हा बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो लावू इच्छितात त्यांना लाजा वाटल्या पाहिजेत, अशी टीका त्यांनी केली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मराठी माणसा एक हो…यंदाच्या सोहळ्याची संकल्पना माय मराठी मराठी माणसा एक हो…यंदाच्या सोहळ्याची संकल्पना माय मराठी
शिवसेना दक्षिण मुंबई विभाग क्रमांक 12 च्यावतीने शिवसेवा प्रतिष्ठानच्या सहकार्याने हिंदू  नववर्ष स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यंदाच्या सोहळ्याची संकल्पना...
ठाणे, रायगड, पालघरमध्ये जल्लोष, शोभायात्रांचे आकर्षण
बिहारमध्ये पुन्हा नितीश कुमार यांच्याच नेतृत्वाखाली लढणार, अमित शहा यांनी खेळली महाराष्ट्राची चाल
मराठी वाचा, बोला, लिहा… शिवसह्याद्री फाउंडेशनने केला मायमराठीचा जागर
राज्यपाल हरिभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात, तांत्रिक बिघाड झाल्याचे उघड
शोभायात्रांनी दुमदुमली मुंबईनगरी! तरुणाईचा उत्साह
म्यानमारमध्ये पुन्हा भूकंप; अनेकजण अजूनही बेपत्ता कुजलेल्या मृतदेहांमुळे दुर्गंधी; नातेवाईकांची शोधाशोध सुरूच