नारायण राणेंच्या त्या आरोपांना रोखठोक उत्तर! खरंच उद्धव ठाकरे यांनी केला होता फोन? संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

नारायण राणेंच्या त्या आरोपांना रोखठोक उत्तर! खरंच उद्धव ठाकरे यांनी केला होता फोन? संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा तापलेला असतानाच राज्यात दिशा सालियन आणि अभिनेता सुशांत सिंह यांच्या मृत्यूचे प्रकरण पण समोर आले आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्याला, माझ्या मुलाचे नाव या प्रकरणात घेऊ नका म्हणून फोन केला होता, असा दावा भाजपा नेते नारायण राणे यांनी केला होता. हा दावा खासदार संजय राऊत यांनी खोडला आणि एक मोठा गौप्यस्फोट केला. त्यामुळे राणे विरुद्ध ठाकरे हा जुना राग पुन्हा आळवल्या जात असल्याचे चित्र दिसत आहे.

काय म्हणाले होते नारायण राणे ?

काल नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत आरोपांची राळ उडवून दिली होती. दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव न घेण्यासाठी त्यांनी फोन केल्याचा दावा राणे यांनी केला. वांद्रेच्या पुढे असताना मिलिंद नार्वेकरांनी फोन केला होता. त्यावेळी उद्धव ठाकरे बोलले. त्यानंतर रुग्णालयाच्या परवानगीवेळी त्यांच्याशी बोलणे झाले. दोन्ही वेळाला उद्धव ठाकरे यांनी आदित्यचं नाव घेऊ नका, असे सांगितल्याचे राणे यांनी दावा केला.

ठाकरे म्हणाले, राणेंना फोन केला नाही

संजय राऊत यांनी आज सकाळी पत्र परिषद घेतली. त्यावेळी त्यांना नारायण राणे यांच्या दाव्याविषयी विचारण्यात आले. आपण उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांना या दाव्याविषयी विचारणा केली. या दोघांनी राणे यांना फोन केल्याचा इनकार केला आहे असा खुलासा संजय राऊत यांनी केला. नारायण राणे इतक्या वर्षानंतर कशाच्या आधारावर असे वक्तव्य करत आहेत, हे समजून घेणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. त्यांनी आता सत्तरी पार केली आहे. आम्हाला त्यांच्या प्रकृतीची चिंता वाटते, असा खोचक टोलाही राऊतांनी लगावला.

उलट राणेंच्या सुटकेसाठी फोन

त्यावेळी मुख्यमंत्र्यांवरती जे भाष्य केले. त्यामुळे नारायण राणे यांना अटक झाली त्यावेळी त्यांच्या कुटुंबियांकडून उद्धव ठाकरे यांना फोन आला होता. त्यांना सांभाळून घ्या. त्यांची प्रकृती बरी नाही. त्यांना काही त्रास आहे. केंद्रातून सुद्धा फोन आला होता. त्यांच्या सुटकेसाठी अमित शाह यांचा फोन आला होता. त्यानंतर संध्याकाळी उद्धव ठाकरे यांनी पोलिसांना सूचना केल्या आणि त्यांची सूटका झाली असा गौप्यस्फोट खासदार संजय राऊत यांनी केला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कार्तिक आर्यन याच्या मागून चालणाऱ्या श्रीलीला हीला गर्दीने खेचले, स्टाफने वाचवले, हैराण करणारा Video कार्तिक आर्यन याच्या मागून चालणाऱ्या श्रीलीला हीला गर्दीने खेचले, स्टाफने वाचवले, हैराण करणारा Video
अभिनेता कार्तिक आर्यन आणि श्रीलीला ही जोडी सध्या चर्चेत आहे. त्यांच्या अपकमिंग प्रोजेक्ट संदर्भात दोघेही बिझी आहे. त्यांच्यात अफेअर सुरु...
IPL 2025 गुजरातचा ‘सुंदर’ विजय, हैदराबादला नमवले
महाजन यांनी उगाच आदळ आपट करण्याची काहीच गरज नाही,काय म्हणाले एकनाथ खडसे?
‘एकनाथ शिंदे हेच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’; शिवसेना खासदाराचं मोठं वक्तव्य
पहिल्या चित्रपटाच्या यशानंतर रात्रीतून स्टार बनली, त्यानंतरही ही अभिनेत्री ठरली ‘कास्टिंग काउच’ची शिकार
Pune News – पुण्याच्या नाना पेठेत लाकडी वाड्याला भीषण आग, अग्नीशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल
पॅरा जंपिंगदरम्यान पॅराशुटमध्ये तांत्रिक बिघाड, हवाई दलातील पॅरा जंप प्रशिक्षकाचा जमिनीवर कोसळून दुर्दैवी मृत्यू