Sushant Singh Rajput: सुशांतला आत्महत्येस कोणी प्रवृत्त केलं? चॅटमधून कोणते खुलासे? CBI रिपोर्टचे 10 मुद्दे

Sushant Singh Rajput: सुशांतला आत्महत्येस कोणी प्रवृत्त केलं? चॅटमधून कोणते खुलासे? CBI रिपोर्टचे 10 मुद्दे

अभिनता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी संबंधित दोन्ही प्रकरणांचा तपास बंद करण्याचा निर्णय केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) घेतला आहे. याबाबत न्यायालयात तपास बंद करण्याची शिफारस सीबीआयकडून करण्यात आली आहे. सुशांतच्या मृत्यूबद्दल करण्यात आलेल्या आरोपांबाबत कोणतेही पुरावे सीबीआयला सापडले नसल्यामुळे याबाबत ही शिफारस करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. सुशांतच्या वडिलांनी 2020 मध्ये बिहारमधील पाटणा इथं अभिनेत्री आणि सुशांतची एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि इतरांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणं, आर्थिक फसवणूक आणि मानसिक छळाचे आरोप करत तक्रार केली होती. त्याचवेळी रिया चक्रवर्तीने मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल करून सुशांतच्या बहिणींनी त्याच्यासाठी बनावट वैद्यकीय प्रिस्क्रिप्शन मिळवल्याचा आरोप केला होता. त्या प्रकरणाचाही तपास सीबीआय करत होती. आता या केसशी संबंधित दहा महत्त्वपूर्ण मुद्दे पाहुयात..

  1. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान सीबीआयला असे कोणतेही पुरावे सापडले नाहीत की ज्यामुळे सुशांतला आत्महत्या करण्यास भाग पाडलं गेलं हे सिद्ध होईल.
  2. सुशांतला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या दाव्यांना सीबीआयने स्पष्टपणे फेटाळलं आहे.
  3. सुशांह सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात, एम्सच्या फॉरेन्सिक टीमने अभिनेत्याचा गळा दाबून हत्या आणि विषबाधा झाल्याची शक्यतादेखील फेटाळून लावली होती.
  4. सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टमध्ये सुशांतच्या मृत्यूचं खरं कारण आत्महत्या असल्याचं सांगण्या आलं आहे.
  5. सुशांतच्या आत्महत्येचा आणि कट रचल्याच्या आरोपांचा तपास सीबीआयने एम्सच्या तज्ज्ञांच्या मदतीने केला होता. एम्सच्या फॉरेन्सिक टीमने कोणताही कट रचल्याच्या शक्यतांना नकार दिला आहे.
  6. सुशांतच्या सोशल मीडिया चॅट्सना एमएलएटीद्वारे (MLAT) अमेरिकेला पाठवण्यात आलं होतं, जेणेकडून त्याची चौकशी करता येईल. या चौकशी अहवालात, सुशांतच्या चॅटमध्ये कोणत्याही प्रकारची छेडछाड झाली नसल्याचं स्पष्टफणे नमूद केलं आहे.
  7. सीबीआयने क्लोजर रिपोर्ट सादर केल्यानंतरही जर सुशांतच्या कुटुंबाला खटला सुरू ठेवायचा असेल तर ते मुंबई न्यायालयात व्ही प्रोटेस्ट याचिका दाखल करू शकतात.
  8. सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबीयांनी त्याची एक्स गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर त्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप केला होता. मात्र, आता सीबीआयने या प्रकरणात रिया आणि तिच्या कुटुंबालाही क्लीन चिट दिली आहे.
  9. रिया चक्रवर्तीला क्लीन चिट मिळाल्यानंतर तिचे वकील सतीश मानेशिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. “मला अभिमान आहे की मी एका सैनिकाच्या कुटुंबाचा बचाव केला. मी रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबाला सलाम करतो. रियाला खूप त्रासांना तोंड द्यावं लागलं.”
  10. रियाच्या वकिलांनी असंही म्हटलंय की, “निष्पाप लोकांना त्रास देण्यात आला आहे. त्यांची मीडिया आणि तपास अधिकाऱ्यांसमोर परेड करण्यात आली. हे कोणत्याही परिस्थितीत पुन्हा घडणार नाही, अशी मी अपेक्षा करतो.”

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ग्रँट रोडमधील रस्तादुरुस्ती येतेय झाडांच्या ‘जिवावर’! कंत्राटदारावर कारवाई करण्याची शिवसेनेची मागणी ग्रँट रोडमधील रस्तादुरुस्ती येतेय झाडांच्या ‘जिवावर’! कंत्राटदारावर कारवाई करण्याची शिवसेनेची मागणी
ग्रँट रोड पश्चिम स्लेटर रोड व पोचरखानवाला रस्ता येथील पालिकेच्या माध्यमातून सुरू असलेली रस्तादुरुस्ती झाडांच्या जिवावर बेतत असल्याचा संतापजनक प्रकार...
इस्रायलच्या हल्ल्यात 25 ठार
‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद
रत्नागिरी पोलीसांची धडक कारवाई, ब्राऊन हेरॉईनच्या 154 पुड्या आणि साडेपाच किलो गांजा जप्त
अमेरिकेने चीनवर लावला 104 टक्के टॅरिफ, ट्रम्प यांच्या निर्णयाचा चीनला मोठा फटका
‘त्या’ नराधमाने प्रेयसीच्या दुसऱ्या मुलीवरही केलेले लैंगिक अत्याचार
‘या सरकारने सगळं ढिले….,’ दीनानाथ हॉस्पिटलप्रकरणी काय म्हणाले जयंत पाटील