‘KBC 16’ मुळे 7 महिन्यांत अमिताभ बच्चन मालामाल; शोमधून तब्बल एवढ्या कोटींची कमाई
‘कौन बनेगा करोडपती’च्या 16 व्या सीझन आता संपला आहे. सीझनच्या शेवटी, अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या प्रेक्षकांचा भावनिक निरोपही घेतला. अमिताभ बच्चन गेल्या 25 वर्षांपासून या शोशी जोडलेले आहेत. 2000 मध्ये, अमिताभ बच्चन यांनी ‘कौन बनेगा करोडपती’ या रिअॅलिटी शोमधून टीव्हीवर पदार्पण केले. हा शो जेव्हा सुरु झाला त्यानंतर अनेकदा चर्चा रंगली ती अमिताभ बच्चन यांच्या मानधनाची.
पहिल्या सीझनमध्ये अमिताभ यांचं मानधन किती होतं?
या शोच्या पहिल्या सीझनमध्ये अमिताभ यांना एका एपिसोडसाठी सुमारे 12.5 लाख मानधन देण्यात आलं होतं . अमिताभ बच्चन दररोज या शोचे 2 भाग शूट करायचे. म्हणजे हॉट सीटवर बसलेला स्पर्धक करोडपती झाला की नाही, पण शो होस्ट करताना अमिताभ बच्चन नक्कीच करोडपती झाले. सूत्रांच्या माहितीनुसार, यावर्षी देखील अमिताभ बच्चन यांनी या शोमधून बऱ्याच कोटींची कमाई केली आहे. एका रिपोर्टनुसार अमिताभ यांनी या शोमध्ये जवळपास 250 कोटी कमावले आहेत.
तसेच कौन बनेगा करोडपतीच्या गेल्या सीझनमध्ये अमिताभ बच्चन यांनी प्रत्येक एपिसोडसाठी सुमारे 1.25 कोटी रुपये घेतले होते. एका दिवसात दोन भागांच्या शूटिंगमुळे त्यांची दैनिक कमाई 2.5 कोटी रुपये होती आणि त्यानुसार, अमिताभ बच्चन यांनी 100 भागांमधून अंदाजे 125 कोटी रुपये कमावले.
16 व्या सीझनमध्ये बिग बी यांची कमाई किती?
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यावर्षी अमिताभ बच्चन यांना केबीसीच्या प्रत्येक भागासाठी 2.5 कोटी रुपये मिळाले आहेत, हे पैसे त्यांच्या मागील मानधनाच्या दुप्पट आहेत. या वर्षीही त्यांनी दिवसाला दोन भागांचे शूटिंग करण्याचे वेळापत्रक पाळलं. ज्यामुळे त्याचे दैनंदिन उत्पन्न 5 कोटी रुपयांवर पोहोचलं. या सीझनमधये त्यांनी केबीसीसाठी 75 दिवस शूटिंग केलं. म्हणजेच त्यांनी या सीझनमध्ये अंदाजे 375 कोटी रुपये कमावले.
अमिताभ बच्चन यांचे वेळापत्रक कसे होते?
अमिताभ बच्चन आठवड्यातून 2 ते 3 दिवस ‘कौन बनेगा करोडपती’चे शूटिंग करायचे. दरम्यान, निर्माते त्यांना त्याच्या पूर्वीच्या कामांसाठी आणि चित्रपटाच्या शूटिंगसाठी वेळ देत असत. केबीसी शो संपण्याच्या सुमारे एक महिना आधी संपूर्ण शूटिंग पूर्ण करण्यासाठी अमिताभ बच्चन आणि केबीसी टीमकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. म्हणूनच केबीसीचे शूटिंग सीझन सुरू होण्याच्या दीड महिना आधी सुरू होतं.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List