बापरे इतकं प्रेम, चाहतीने संजय दत्तच्या नावावर 72 कोटी केले, अन् त्याच क्षणी तिच्या मृत्यूची बातमी

बापरे इतकं प्रेम, चाहतीने संजय दत्तच्या नावावर 72 कोटी केले, अन् त्याच क्षणी तिच्या मृत्यूची बातमी

चाहते आपल्या आवडत्या सेलिब्रिटाला पाहण्यासाठी किती काय करत असतात. त्यांची एक झलत पाहण्यासाठी सेटवर, किंवा त्यांच्या घराच्या बाहेर तासंतास थांबताना दिसतात. तर अनेक चाहते सेलिब्रिटींसाठी पत्र लिहितात, त्यांच्यासाठी छान छान गिफ्टस् पाठवतात. पण एक चाहती अशीही होती कि तिने आपल्या आवडीच्या अभिनेत्याच्या नावावर चक्क 72 कोटी ठेवले होते.

मृत्यूपूर्वी सर्व मालमत्ता संजयच्या नावावर केली

हा अभिनेता म्हणजे संजय दत्त. ती मुलगी संजय दत्तची एवढी मोठी फॅन होती कि तिने आपली 72 कोटी संपत्ती त्याच्या नावावरून केली होती.याची माहिती त्याला चक्क पोलिसांनी फोन करून दिली होती. 2018 मध्ये, एकदा संजय दत्तला पोलिसांचा फोन आला. त्यांनी संजयला सांगितलं की निशा पाटील या त्याच्या चाहतीने त्याच्या नावावर 72 कोटी केले आहेत. पण याची दुसरी बाजू मात्र अत्यंत भावनिक होती. कारण निशाने मृत्यूपूर्वी तिची सर्व मालमत्ता संजयच्या नावावर केली होती.

चाहतीने तिची संपूर्ण मालमत्ता संजय दत्तच्या नावावर का केली?

निशाने आपल्या मृत्यूपूर्वी तिची सर्व मालमत्ता संजयच्या नावावर केल्याचं वकिलांनी सांगितलं. निशाच्या मृत्यूच्या दुसऱ्या दिवशीच पोलिसांकडून संजय दत्तला फोन गेला होता. जेव्हा पोलिसांनी त्याला निशाने त्याच्यासाठी सुमारे 72 कोटी रुपयांची मालमत्ता सोडल्याचं सांगितलं होतं. आणि हे ऐकून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.. कथितपणे, निशानं बॅंकेला अनेकदा पत्र लिहिले आणि अधिकाऱ्यांना सांगितलं की तिची संपूर्ण प्रॉपर्टी ही तिचा आवडता बॉलिवूड अभिनेत्याच्या अर्थात संजय दत्तच्या नावावर करायची आहे असं पत्रात लिहिलं होतं. हे ऐकल्यानंतर संजय दत्तला आश्चर्याचा मोठा धक्का बसला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sanjay Dutt (@duttsanjay)

संजयला ऐकून धक्का बसला 

या सगळ्या प्रकरणानंतर संजय दत्तच्या वकिलांनी सांगितलं होतं की तो 72 कोटींची ती संपत्ती स्वीकारू शकत नाही. कारण तो निशाला ओळखत नाही. संजय दत्तनं देखील त्यावेळी हेच सांगितलं होतं. त्यानं म्हटलं होतं की “मी काही क्लेम करणार नाही. मी निशाला ओळखत नव्हतो आणि या संपूर्ण घटनेविषयी आता काही बोलू शकत नाही. महत्त्वाचं म्हणजे हे सगळं कळल्यानंतर मलाही धक्का बसला आहे.” संजय दत्तने देखील निशाच्या मृत्यूबाबत दु:ख व्यक्त करत तिने प्रेमापोटी घेतलेल्या निर्णयासाठी आदर व्यक्त करत ते पैसे नाकारले होते.

संजय दत्तची एकूण संपत्ती जवळपास 295 कोटींच्या घरात 

संजयने 135 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. संजय दत्तच्या एकूण संपत्तीविषयी बोलायचं झालं तर ती जवळपास 295 कोटींची आहे. तर एका चित्रपटासाठी तो जवळपास 8-15 कोटी घेतो. तर ZimAfro T10 आणि B-Love Kandy सारख्या क्रिकेट टीमचा तो सह-मालक आहे. त्याशिवाय, संजयचे दोन प्रोडक्शन हाउस होते. त्यानं स्नीकर मार्केटप्लेस पासून त्याच्या स्कॉच व्हिस्की ब्रॅंड The Glenwalk सोबत इतर स्टार्ट-अप्समध्ये गुंतवणूक केली आहे. त्याच्या संपत्तीविषयी बोलायचं झालं तर मुंबईत असलेल्या त्याच्या घराची किंमत ही 40 कोटींच्या आसपास आहे. त्यासोबत दुबईमध्ये एक आलिशान घर देखील आहे. इतकंच नाही तर कार कलेक्शनसोबक बाइकचं देखील खास कलेक्शन आहे.

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

देशाचा नव्हे, हिंदीचा विकास हाच राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा हेतू; एम. के. स्टॅलिन यांची टीका देशाचा नव्हे, हिंदीचा विकास हाच राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा हेतू; एम. के. स्टॅलिन यांची टीका
हिंदीचा विकास हाच राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा हेतू आहे. त्यात देशाचा विकासाचा त्यात मागमूस नाही, अशा शब्दांत तामिळनाडूचे मुखअयमंत्री एम. के....
होळी आणि धुलीवंदनात रंगाचा बेरंग होऊ नये यासाठी कडकोट बंदोबस्त, शहराला येणार छावणीचे स्वरुप
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून मिळणार? अधिवेशनातून सर्वात मोठी बातमी समोर
पीओपी मूर्तींवरील बंदीबाबत सरकारने न्यायालयात फेरयाचिका दाखल करावी, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची मागणी
Sambhaji Nagar News – पोलीस अंमलदाराने वाचवले भाजी विक्रेत्याचे प्राण, आयुक्तांकडून कौतुक
मेहुणीवर जीव जडला, मग क्राईम शो पाहून साडूचा काटा काढला; एकतर्फी प्रेमाचा धक्कादायक अंत
Ratnagiri News – हुरा रे हुरा… आमच्या भैरीबुवाला सोन्याचा तुरा रे…. कोकणात शिमगोत्सवाची धूम