हे किती अश्लील..; केतिका शर्माचा डान्स पाहून गाण्यावर बंदीची मागणी
काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि दाक्षिणात्य अभिनेते नंदमुरी बालकृष्ण यांचं ‘डबिडी डिबिडी’ हे गाणं आणि त्यातील डान्स स्टेप्स व्हायरल झालं होतं. उर्वशी आणि नंदमुरी बालकृष्ण यांच्या डान्स स्टेप्सवरून अनेकांनी आक्षेप घेतला होता. आता असंच काहीसं श्रीलीला आणि नितीन यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘रॉबिनहुड’ या चित्रपटातील गाण्याबाबत पहायला मिळतंय. या चित्रपटातील ‘सरप्रिसु’ हे गाणं सध्या सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे. या गाण्याचे बोल आणि त्यावर अभिनेत्री केतिका शर्माचे डान्स स्टेप्स अश्लील असल्याचा आरोप नेटकऱ्यांनी केला आहे. इतकंच नव्हे तर या गाण्यावर बंदी आणण्याचीही मागणी केली जात आहे.
‘अधि धा सरप्रिसु’ या गाण्याचा व्हिडीओ 10 मार्ज रोजी सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. तेव्हापासूनच हे गाणं चर्चेत आलं आहे. या गाण्यातील अभिनेत्रीचे स्टेप्स पाहून नेटकरी भडकले आहेत. निती मोहन आणि अनुराग कुलकर्णी यांच्या आवाजात हे गाणं रेकॉर्ड करण्यात आलं असून त्याचे बोल चंद्रबोस यांनी लिहिले आहेत. या गाण्यातून अश्लीलता पसरवली जातत असल्याचं अनेकांनी म्हटलंय. युट्यूबवर हे गाणं सहज कोणालाही पाहता येत असल्याने लहान मुलांवर त्याचा वाईट परिणाम होईल यामुळे त्यावर बंदी आणण्याची मागणी केली जात आहे. या गाण्याच्या कोरिओग्राफरवरही बरीच टीका केली जात आहे.
‘कोरिओग्राफर शेखर मास्टरने आता रिटायर होण्याची गरज आहे’, असं एकाने लिहिलंय. तर ‘हे कोणत्याच दृष्टीने रोमँटिक किंवा मनोरंजक नाही. ही कोरिओग्राफी अत्यंत अश्लील आहे’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘अशा पद्धतीच्या गाण्यांवर आणि कोरिओग्राफीवर बंदी आणली पाहिजे’, अशी मागणी नेटकऱ्यांनी केली आहे. कोरिओग्राफर शेखर अशा पद्धतीने ट्रोल होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी उर्वशी आणि नंदमुरी बालकृष्ण यांच्या ‘डबिडी डिबिडी’ गाण्यावरूनही बरीच ट्रोलिंग झाली होती. त्यापूर्वी ‘मिस्टर बच्चन’ या चित्रपटातील रवि तेजा आणि भाग्यश्री बोरसे यांच्यावर चित्रित गाण्यावरूनही वाद झाला होता. त्या गाण्याचीही कोरिओग्राफी शेखर मास्टरने केली होती.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List