‘छावा’ सिनेमा पाहणं पडलं महागात, मकोकातील 2 आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Chhaava: अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना स्टारर ‘छावा’ सिनेमाचा सख्या सर्वत्र बोलबाला पाहायला मिळत आहे. सिनेमात विकी याने छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेला न्याय दिला आहे, तर अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी येसूबाई भोसले यांची भूमिका साकारली आहे. सिनेमा पाण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये येणाऱ्या प्रेक्षकांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. पण दोन प्रेक्षकांना ‘छावा’ सिनेमा पाहणं महागात पडलं आहे.
‘छावा’ सिनेमा बघण्यासाठी आलेल्या मकोकातील 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुण्यातील हडपसरमधील वैभव टॉकीज परिसरातून दोघांना अटक करण्यात आली आहे. धर्मेनसिंग आणि बादशाहसिंग अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हडपसर मधील एक मल्टीप्लेक्स सिनेमागृहातून दोघांनी पोलिसांना ताब्यात घेतलं आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून दोघे फारर असल्याची देखील माहिती समोर आली आहे. दिघी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हे दाखल आहेत.
सांगायचं झालं तर, ‘छावा’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करताना दिसत आहे. दुसरीकडे सिनेमा अनेकदा वादाच्या भोवऱ्यात देखील अडकला. संभाजी ब्रिगेड आणि इतिहास संशोधकांनी चित्रपटातील ऐतिहासिक विकृतीकरणावर आक्षेप घेतला होता. शिवाय ओटीटी आणि अन्य माध्यमांवर प्रदर्शन रोखण्यासाठी कारवाईची मागणी देखील करण्यात आली.
‘छावा’ सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी देखीव वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास मांडणारा बहुप्रतिक्षित ‘छावा’ या हिंदी सिनेमाच्या ट्रेलरवरून वाद निर्माण झाला होता. छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणाी येसूबाई यांचा लेझीम नृत्य करतानाचा हा प्रसंग होता. अखेर सिनेमातून लेझीम नृत्य करतानाचा सीन वगळ्यानंतर सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला.
‘छावा’ सिनेमाची कमाई
‘छावा’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर नवे विक्रम रचताना दिसत आहे. सिनेमाने आतापर्यंत 228 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. सिनेमा 300 कोटींचा आकडा पार करेल असं देखील सांगण्यात येत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘छावा’ सिनेमाची चर्चा रंगली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List