मंगळवेढ्यातील सोड्डीतून पावणेनऊ लाखांचा गांजा जप्त
मंगळवेढा तालुक्यातील सोड्डी हद्दीत गांजाच्या झाडांची लागवड केल्याठिकाणी पोलिसांनी छापा टाकून 43 किलो 958 ग्रॅम वजनाचा सुमारे 8 लाख 79 हजार 160 रुपये किमतीचा गांजा जप्त केला. मंगळवेढा पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरण सोमण्णा बिराजदार (वय 58) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
सोड्डी परिसरात असलेल्या गट नं. 324 /1/ब/2 मध्ये गांजाची लागवड केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलीस पथकाला कारवाईचे आदेश
दिले. पथकाने घटनास्थळी जाऊन शेतात शोध घेतला असता जवसाच्या पिकासोबत साधारण दोन फुटापासून सहा फूट उंचीची लहान-मोठी गांजाची हिरव्या रंगाची पाने, फुले व बोंडे असलेली झाडे आढळून आली. पोलिसांनी 43.958 किलो ग्रॅम वजनाचा सुमारे 8 लाख 79 हजार 160 रुपये किमतीचा गांजा जप्त केला.
ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक अंकुश वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक विजय पिसे, नागेश बनकर, अनिल गडदे, पोलीस हवालदार दिगंबर गेजगे, पोलीस नाईक सचिन बनकर, पोलीस अंमलदार महेश कोरे, सूरज देशमुख, बंडोपंत पुजारी, श्रीकांत देवकते, चालक हरिदास चौधरी यांच्या पथकाने केली
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List