अमेरिकेत बेड्या घालून टॉर्चर केलं गेलं, आजारी असूनही औषधं दिली नाही, हिंदुस्थानची काही इज्जतच नाही; सतपाल सिंगने सांगितलं भयंकर वास्तव
अमेरिकेने हिंदुस्थानी बेकायदा स्थलांतरितांना बेड्या आणि साखळदंडाने जखडून लष्कराच्या विमानातून पाठवले. ना स्वच्छतागृहात जाण्याची परवानगी होती ना पुरेसे अन्न-पाणी देण्यात आले. अमेरिकेतून मायदेशात आलेल्या पंजाबमधील एका तरुणाने आपले कसे हाल झाले याची कहाणी सांगितली. अमेरिकेत हिंदुस्थानची काही इज्जत नाही, असे म्हणत इंडिया टुडेच्या एका कार्यक्रमात त्याने आपली व्यथा मांडली.
पंजाबमधील सतपाल सिंग हा तरुण आपली जमीन विकून अमेरिकेत गेला. यासाठी सतपाल सिंगने एजंटला 55 लाख रुपये दिले. पण एजंटने त्याला फसवलं आणि अवैध मार्गाने अमेरिकेत पाठवले, असे सतपाल सिंग म्हणाला. अमेरिकेत आपल्यासोबत काय घडलं हेही त्याने सांगितलं. फक्त हिंदुस्थानींनाच बेड्या घातल्या गेल्या. इतर देशांच्या नागरिकांना बेड्या घातल्या गेल्या. हिंदुस्थानी तरुणींना बेड्या घातल्या गेल्या. पण तिथे स्पॅनिश महिला होत्या. त्यांना मोकळं ठेवलं गेलं होतं, असे सतपाल सिंग याने सांगितले.
आम्हाला बेड्या घालून पनामामध्ये आणण्यात आले. पनामामध्ये आम्हाला 15 दिवस ठेवले. अमेरिकेत कॅलिफोर्नियात सैनिकांनी 5 दिवस ठेवले होते. तिथे इतके हाल झाले की आजारा पडलं तरी आमच्याकडे दुर्लक्ष केलं. साध्या तापाची औषधंही दिली नाहीत. एवढी कुलिंग ठेवली होती तिथे की कोणी आजारी असलं तरीही त्याला तिथेच ठेवत होते. मुद्दा कुलिंग वाढवत होते. एक-एक तासाने टॉर्चर करत होते. हिंदुस्थानींना अतिशय वाईट वागणूक दिली जाते. एवढी वाईट वागणूक फक्त हिंदुस्थानीना दिली जाते, इतर कुठल्या देशाच्या नागरिकांना दिली जात नाही, असे भयंकर वास्तव सतपाल सिंग याने सांगितले.
बेरोजगारीमुळे देश सोडावा लागला. आम्ही फिरोजपूरमध्ये सीमेवर राहतो. पावसाळ्यात पूर आला की आमच्या गावात पाणी शिरतं. बिकट परिस्थितीमुळे घर सोडावं लागलं. माझ्या सारखे फिरोजपूरमधले अनेक तरुण अमेरिकेत अडकले आहेत. काही तरुण मेक्सिकोमध्ये आहेत, असे सतपाल सिंग म्हणाला. बाहेर देशात जाण्यात काहीच फायदा नाही. कुठल्याही देशात हिंदुस्थानींचं ऐकलं जात नाही. एखाद्या जनावराप्रमाणे हिंदुस्थानींना वागणूक दिली जाते, असे त्याने सांगितले.
हिंदुस्थानपेक्षा बेस्ट कुठला देश नाही. आपलं घर ते आपलं असतं. त्यामुळे कुठल्याही तरुणाने देश सोडून जाऊ नये. बेरोजगारीमुळे मी गेलो. घरात गरीबी होती. घरात बिकट परिस्थिती पाहून मी कायम चिंतेत असायचो. त्यामुळे मीही पुढे जाण्याचा विचार केला. पैसे नव्हते त्यामुळे योग्य उपचार करता न आल्याने माझ्या वडिलांचं निधन झाला. वडिलांची किडनी फेल झाली होती. त्यांना साधं डायलिसिस करण्यासाठी आमच्याकडे पैसे नव्हते. माझी आईही आजारी आहे. पण आमच्याकडे पैसे नसल्यामुळे योग्य उपचार करता आले नाहीत, असे सतपाल सिंग म्हणाला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List