ICC वनडे स्पर्धांच्या फायनलमध्ये एकमेव हिंदुस्थानी पठ्ठ्याने ठोकलंय शतक, हा विक्रम कोण मोडणार?
सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभवाच पाणी पाजत टीम इंडियाने अगदी थाटात फायनलमध्ये प्रवेश केला. रविवारी (9 मार्च 2025) टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल दुबईमध्ये खेळली जाणार आहे. दोन्ही संघ तुल्यबळ असून चॅम्पियन होण्यासाठी सज्ज झाले आहेत. साखळी फेरीतील अंतिम सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा पराभव केला होता. त्यामुळे फायनल सामन्यातही टीम इंडियाचे पारडे जड मानले जात आहे.
टीम इंडियाने आतापर्यंत अनेकवेळा फायनलमध्ये धडक मारली आहे. टीम इंडियाच्या अनेक फलंदाजांनी फायनलमध्ये दमदार खेळ करत संघासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. परंतु ICC वनडे स्पर्धांच्या फायनल सामन्यांचा विचार करता टीम इंडियाच्या फक्त एकाच फलंदाजाला शतक ठोकण्यात यश आले आहे. 25 वर्षांपूर्वी म्हणजेच 2000 साली झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध कर्णधार सौरभ गांगुलीने 130 चेंडूंमध्ये 117 धावा चोपून काढल्या होत्या. दुर्दैवाने या सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला. परंतु या सामन्यानंतर आतापर्यंत एकाही टीम इंडियाच्या फलंदाजांला वनडे स्पर्धांच्या फायनलमध्ये शतक ठोकता आलेलं नाही.
ICC Champions Trophy 2025 – नो टेन्शन… पाऊस पडला तरी चॅम्पियन्स ठरणार
विराट कोहली, शुभमन गिल, श्रेयस अय्यर हे सध्या जबरदस्त फॉर्मात आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून संघाला दमदार खेळाची अपेक्षा आहे. तसेच कर्णधार रोहित शर्माकडून सुद्धा संघाला विस्फोटक फलंदाजीची अपेक्षा असणार आहे. त्यामुळे रविवारी (9 मार्च 2025) दुबईमध्ये होणाऱ्या फायनलमध्ये 25 वर्षांपूर्वीचा शतक ठोकण्याचा सौरभ गांगुलीचा विक्रम कोण मोडणार हे पाहण्यासाठी चाहते उस्तुक आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List