देशाला Hindia बनवण्याचा प्रयत्न; कमल हसन यांचा भाजपवर संताप

देशाला Hindia बनवण्याचा प्रयत्न; कमल हसन यांचा भाजपवर संताप

देशभरात मतदारसंघ पुनर्रचनेच्या मुद्द्यावरून तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलीन यांनी भाजपवर हल्लाबोल केला होता. यामुळे तामिळनाडूचे प्रतीनिधीत्व कमी होणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले होते. तसेच भाजप दक्षिणेतील राज्यांवर हिंदीचा प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहे, असेही ते म्हणाले होते. आता त्यांच्या विधानाला अभिनेते आणि राजकारणी कमल हसन यांनी पाठिंबा दर्शवला आहे. इंडियाला हिंदीया बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे का, असा सवाल करत त्यांनी भाजपवर संताप व्यक्त केला आहे.

कमल हसन यांनी एमके स्टॅलिन यांच्या 2019 च्या वक्तव्याचे समर्थन केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या ‘हिंदी दिवसा’ बाबत सोशल मीडियावर पोस्ट केली होती. त्यावेळी स्टॅलिन यांनी केलेल्या वक्तव्यामध्ये ‘हिंदिया’बाबत संदर्भ होता. या वक्तव्याचा दाखला देत हसन यांनी इंडियाला हिंदीया बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशा शब्दांत हसन यांनी भाजपवर संताप व्यक्त केला आहे.

कमल हासन यांनी बुधवारी तामिळनाडूतील सत्ताधारी द्रमुक आणि भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारमधील दक्ष्णेतील राज्यांवर सक्तीने हिंदी लादणे आणि मतदारसंघाच्या सीमांकनाच्या वादात उडी घेतली. बिगर-हिंदी भाषिक राज्यांना हिंदी भाषा स्वीकारण्यास भाग पाडून केंद्र सरकार इंडियाचे हिंदीया करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. केंद्र सर्व राज्यांना हिंदी बोलायला लावण्याचा आणि बहुमताने निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. इंडिया हे आमचे स्वप्न आहे…तर ‘हिंदिया’ हे त्यांचे स्वप्न आहे,असा संतापही त्यांनी व्यक्त केला.

हिंदी भाषा ही जागतिक स्तरावर देशाची ओळख आहे, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमिश शहा यांनी 2019 मध्ये हिंदी भाषा दिनानिमित्त केले होते. त्यावर आपला देश इंडिया आणहे, हिंदीया नाही, असे स्टॅलीन यांनी म्हटले होते. त्याचा संदर्भ देत कमल हसन यांनी हे विधआन केले आहे. कमल हासन यांनी दक्षिणेकडील राज्यांवर हिंदी लादण्याच्या मुद्द्यावर चिंता व्यक्त करत याविरोधात आवाज उठवला आहे.

आपल्या भाषेसाठी तमिळ लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. त्यामुळे त्यांच्या भावनांशी खेळत भाषेचा मुद्द्यावर राजकारण करू नका, असा इशाराही कमल हसन यांनी दिला आहे. कमल हासन यांनी त्यांच्या भाषणात सीमांकन थांबवण्याची मागणीही केली. तामिळनाडू आणि इतर दक्षिणेकडील राज्यांना भीती आहे की यामुळे त्यांचे खासदार कमी होतील. केंद्राने लोकसंख्येच्या प्रमाणात प्रत्येक राज्याला वाटप केलेल्या आमदारांची संख्या वाढवली पाहिजे, असेही ते म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

स्वारगेट बलात्कार प्रकरण – पोलीस गणवेशात आरोपी गाडेचा होता एसटी स्थानकात वावर स्वारगेट बलात्कार प्रकरण – पोलीस गणवेशात आरोपी गाडेचा होता एसटी स्थानकात वावर
शहरातील मध्यवर्ती स्वारगेट एसटी स्थानकात तरुणीला धमकावून बलात्कार करणारा आरोपी दत्तात्रय गाडे हा पोलिसांचा गणवेश परिधान करून एसटी स्थानकाच्या आवारात...
माझ्याकडून लिहून घ्या, नितीश कुमार पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री होणार नाहीत; प्रशांत किशोर यांचं भाकीत
महिलांची फक्त पूजा करू नका! दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांचे प्रतिपादन
लग्नाचे वचन मोडले म्हणजे बलात्कार नाही – सर्वोच्च न्यायालय
‘जंगलाचा राजा’ गुजरातमध्ये असुरक्षित; अवघ्या दोन वर्षांत 286 सिंहांचा धक्कादायक मृत्यू
सोन्याची तस्करी करताना कन्नड अभिनेत्रीला अटक
अपिलाचा निकाल लागेपर्यंत शिक्षेला स्थगिती