चीनमधील महिलांमध्ये व्हर्च्युअल रोमान्सचा नवा ट्रेंड
चीनमधील महिलांमध्ये एआय चॅटबॉट्ससोबत व्हर्च्युअल रोमान्सचा नवा ट्रेंड लोकप्रिय झाला आहे. यात महिला एका विशेष एआय चॅटबॉटसोबत व्हर्च्युअलशी प्रेम करत असून यासाठी त्या वाट्टेल तितके पैसे खर्च करत आहेत. या नव्या व्हर्च्युअल डेटिंग सिम्युलेशन गेमने जगभरात धुमाकूळ घातला आहे. यामध्ये लोक आपल्या व्हर्च्युअल बॉयफ्रेंडसोबत भावनात्मक नाते जपण्याचा प्रयत्न करत आहेत. चीनच्या शांघायमधील कंपनी पेपर गेम्सने एक डेटिंग सिम्युलेशन गेम लव अँड डीपस्पेस लाँच केले. या गेममध्ये एआय आणि व्हाईस रिकग्निशन टेक्नोलॉजीचा वापर करून पाच पॅरेक्टर्स बनवले आहेत. चीनमध्ये या गेमचे लाखो युजर्स आहेत. यात महिलांचा समावेश अधिक आहे. ज्या आपल्या व्हर्च्युअल बॉयफ्रेंडसोबत वेळ घालवण्यासाठी बराच पैसा खर्च करत आहेत. हे चॅटबॉट साथीदाराला म्हणजेच युजर्सला चांगले वाटावे यासाठी मेसेज पाठवतात. काय खावे हे सांगतात.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List