उन्हाळ्यात चिया सीड्स वॉटर पिणे का आहे फायदेशीर? एकदा नक्की वाचा!

उन्हाळ्यात चिया सीड्स वॉटर पिणे का आहे फायदेशीर? एकदा नक्की वाचा!

उन्हाळा सुरू होताच शरीरातील उष्णता वाढते, थकवा जाणवतो व सतत पाण्याची कमतरता भासते. त्याच बरोबर उन्हाळ्यात त्वचेच्या समस्या आणि पचनासंबंधी त्रास होऊ लागतो. आशा वेळी खुप पाणी पिणे आणि लाइट खाणे योग्य असते. त्ततच हे काळे छोटे चिया सीड्स तुम्हाला उन्हाळ्यात खुप फायदेशीर ठरतील.

उन्हाळ्यातील सुपरफूड पैकी एक सुपरफूड म्हणजे चिया सीड्स वॉटर. वाढत्या उन्हाळ्यात चिया सीड्स वॉटर हे शरीरासाठी एक नैसर्गिक आणि आरोग्यदायी ड्रींक ठरू शकत. चिया सीड्समध्ये ओमेगा-3, फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि मिनरल्स असतात, जे उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवतात आणि उष्णतेपासून संरक्षण करतात. चला जाणून घेऊया की उन्हाळ्यात चिया सीड्स वॉटर का आणि कसे प्यावे.

उन्हाळ्यात चिया सीड्स वॉटरचे फायदे

१. शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत करतो-

उन्हाळ्यात गरमीमुळे व शरीरातील चिप – चिप मुळे जास्त घाम येतो, ज्यामुळे शरीरातील पाणी कमी होऊन डिहायड्रेशनचा त्रास उद्भभवतात. चिया सीड्स पाण्यात काही तास भिजवल्यावर जेलसारखे होतात आणि हे पोटात जाऊन शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करतात.

२. उष्णतेपासून संरक्षण करते-

चिया सीड्समध्ये थंड प्रभाव असतो. उन्हाळ्यात ते नियमित प्यायल्यास शरीराचे तापमान नियंत्रित राहते आणि उष्णतेपासून संरक्षण होते.

3. उर्जा वाढवते-

उन्हाळ्यात खुप प्रमाणात थकवा आणि कमजोरी जाणवते. चिया सीड्समध्ये असलेले जिवनसत्व शरीराला ऊर्जा देतात, ज्यामुळे दिवसभर ताजेतवाने वाटते.

४. वजन नियंत्रणात रहोते-

चिया सीड्स वॅाटरने पचन मंदावते, ज्यामुळे पोट भरलेले राहते व वारंवार भूख लागत नाही. हे वजन नियंत्रणात ठवण्यास मदत करते.

५. हाडांची मजबूती बनवणे-

चिया सीड्समध्ये खुप प्रमाणात कॅल्शियम, मॅग्नेशियम असतात, जे हाडांसाठी उपयुक्त असतात. उन्हाळ्यात घामामुळे शरीरातून मिनरल्स बाहेर टाकले जातात, दररोज ‘हे’ पेय प्यायल्याने हाड बळकट होण्यास मदत होते.

६. पचनशक्ती वाढवते-

सतत गरम आणि हेवी फुड खाल्याने अनेकांना अपचन, अ‍ॅसिडिटीचा त्रास होतो. चिया सीड्समध्ये फायबर असते, जे पचनसंस्था सुधारवण्यास मदत करते.

असे बनवा चिया सीड्स वॉटर

१. एका ग्लास पाण्यात 1 चमचा चिया सीड्स घाला.

२. चिया सीड्सना पाण्यात 10-15 मिनिटे भिजू द्या (चिया सीड्स जेल सारखे होऊ लागतील)

३. मग ते चांगले ढवळून घ्या (हवअसल्यास त्यात लिंबाचा रस किंवा मध मिसळा)

४. दररोज सकाळी रिकाम्या पोटी किंवा दिवसभर हायड्रेट राहण्यासाठी दिवसातून २वेळा हे प्यावे.

उन्हाळ्यात चिया सीड्स वॉटरप्रमाणेच हे काही इतर ड्रींक्सही नक्की ठरतील फायदेशीर

१. साबजा वॉटर –
चिया सीड्सप्रमाणेच साबजा वॉटर देखील उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यास मदत करेल. हे वॉटर शरीर डिहायड्रेशन टाळण्यास मदत करते.

२. कोकम सरबत –
कोकम हे थंड फळ आहे. कोकम सरबत उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करते

३.तरबूज वॉटर –
तरबूज हे ही एक थंड फळ आहे. याच्या रसात साखर असते त्यामुळे हे शरीराला हायड्रेटेड ठेऊन जीभेला नैसर्गिक गोडसर चव मिळवून देते.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पालकांचा आणि प्रशिक्षकांचा आदर करा – दिलीप वेंगसरकर पालकांचा आणि प्रशिक्षकांचा आदर करा – दिलीप वेंगसरकर
तुम्हाला क्रिकेटच्या मैदानावर, अकादमीत आणण्यासाठी, तुम्हाला क्रिकेटपटू होताना पाहताना किंवा क्रिकेटच्या मैदानातून पुन्हा घरी घेऊन जाताना तुमच्या पालकांना किती मेहनत...
चंद्रपूर जिल्हा शिवसेना पदाधिकारी जाहीर
जेएनपीटीला जोडणाऱ्या सहापदरी रस्त्याला केंद्राची मंजुरी
दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरेंवर नेमका आरोप काय? याचिकेत कुणाकुणाचा उल्लेख? वाचा A टू Z
नागपूर पेटवून सरकार पार्ट्या करत आहे; हर्षवर्धन सपकाळ यांची महायुती सरकारवर टीका
Manipur Violence – मणिपूर अशांतच! चुराचंदपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, एकाचा मृत्यू तर अनेक जखमी
MPSC परीक्षेसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा, आयोगासंदर्भात म्हणाले…