चंद्रपूर जिल्हा शिवसेना पदाधिकारी जाहीर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने चंद्रपूर जिह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आल्या आहेत. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्राद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. या नियुक्त्यांमध्ये संदीप गिऱ्हे यांची जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे कार्यक्षेत्र चंद्रपूर, बल्लारपूर आणि ब्रह्मपुरी असे राहणार आहे. तर रवि शिंदे यांची जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे कार्यक्षेत्र वरोरा, भद्रावती, राजुरा आणि चिमूर असे राहणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List