मुले प्रॉपर्टी बळकावू शकत नाहीत! हायकोर्टाने याचिकाकर्त्या मुलाला खडे बोल सुनावले
म्हाताऱ्या सावत्र आईला घराबाहेर हाकलून लावणाऱ्या मुलाची मुंबई उच्च न्यायालयाने चांगलीच खरडपट्टी काढली. आई-वडील जिवंत असताना प्रॉपर्टीवर मुले कोणताही अधिकार गाजवू शकत नाहीत. तसेच ती प्रॉपर्टी बळकावू शकत नाहीत, असे स्पष्ट करत न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने मुलाला या प्रकरणी जाब विचारला आहे. तसेच पुढील पंधरा दिवसांत वृद्ध आईचे घर रिकामे करावे, असे स्पष्ट आदेश याचिकाकर्त्या मुलाला दिले.
82 वर्षीय वृद्ध आईचे कांदिवली येथे घर असून जानेवारी 2022 साली पतीचे निधन झाल्यानंतर तिच्या धाकटय़ा सावत्र मुलाने तिला घराबाहेर काढले. वृद्ध आई तिच्या मोठय़ा बहिणीसोबत वांद्रे येथे राहते. तिने या प्रकरणी प्राधिकरणाकडे दाद मागितली. प्राधिकरणाने वृद्ध आईला दिलासा देत तिच्या बाजूने निकाल दिला. या निकालाला मुलाने मुंबई हायकोर्टात आव्हान दिले. त्यावर न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्या वेळी न्यायालयाने याचिकाकर्त्या मुलाला व त्याच्या होणाऱ्या पत्नीला त्या घरात राहण्याचा कोणताही अधिकार नसल्याचे स्पष्ट शब्दांत सांगितले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List