‘गँग्स ऑफ डोंबिवली’ आणि साथीदारांना अटक करा ! शिवसेनेच्या शिष्टमंडळाची केडीएमसीच्या आयुक्तांकडे मागणी

‘गँग्स ऑफ डोंबिवली’ आणि साथीदारांना अटक करा ! शिवसेनेच्या शिष्टमंडळाची केडीएमसीच्या आयुक्तांकडे मागणी

कल्याण, डोंबिवलीतील 65 बेकायदा इमारतींमध्ये हजारो कोटींचा घोटाळा करणाऱ्या ‘गँग्स ऑफ डोंबिवली’ आणि त्यांच्या साथीदारांना आधी तत्काळ अटक करा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज केली. केडीएमसीचे आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांची शिष्टमंडळाने भेट घेतली असून खोट्या कागदपत्रांच्या आधारे हजारो कोटींचा घोटाळा करणारी ‘गँग’ व त्यांच्या महापालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर संघटित गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणी दोषी अधिकारी व संबंधित आरोपींची पोलिसांमार्फत चौकशी करून कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्त जाखड यांनी दिले आहे.

पोलीस आयुक्तांना साकडे घालणार

या गंभीर प्रश्नाबाबत येत्या सोमवारी 20 फेब्रुवारी रोजी दीपेश म्हात्रे आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह 65 इमारतीतील रहिवाशांचे एक शिष्टमंडळ ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांची भेट घेणार आहेत. तसेच संबंधित दोषी आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

खोट्या कागदपत्रांच्या आधारे हजारो कोटींचा घोटाळा झाला. ही कागदपत्रे तयार करणाऱ्या टोळीचे म्होरके आज पोलीस प्रोटेक्शनमध्ये फिरत आहेत. त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी करण्यात आली आहे. कल्याण, डोंबिवलीतील 65 बेकायदा इमारतींचा प्रश्न सोडवण्यासाठी लवकरच सुप्रीम कोर्टात दाद मागणार असल्याचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

कल्याण, डोंबिवलीतील बेकायदा इमारती तोडण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याने सुमारे साडेसहा हजार रहिवासी बेघर होणार आहेत. महारेराची बोगस कागदपत्रे बनवणारे अधिकारी आणि बिल्डर मोकाट असून भलत्याच मंडळींना बिल्डर दाखवून त्यांना बळीचा बकरा बनवले आहे. रहिवाशांना न्याय मिळावा यासाठी जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज महापालिका मुख्यालयात जाऊन आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांची भेट घेतली. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील 65 इमारतींची बोगस महारेरा नोंदणी करण्यात आली. त्यामुळे हजारो कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले. दोन हजार कोटींचे बँक लोन व शंभर कोटी पंतप्रधान आवास योजनेचे हेदेखील वाया गेले.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

कल्याण, डोंबिवलीतील 65 बेकायदा इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांच्या पाठीशी शिवसेना ठाम उभी आहे. दरम्यान या प्रश्नावर लवकरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिष्टमंडळासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे दीपेश म्हात्रे यांनी सांगितले.

शिवसेनेच्या शिष्टमंडळाने ही सर्व बाब व बेकायदा इमारतींच्या निमित्ताने झालेला घोटाळा आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिला. महापालिका आयुक्तांनी 65 इमारतींमधील रहिवाशांकडे मानवतेच्या दृष्टिकोनातून पाहावे अशी विनंती करण्यात आली आहे. सध्या दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी रहिवाशांना दिलासा द्यावा, असेही आयुक्तांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

यावेळी शिवसेनेचे जिल्हा संघटक तात्या माने, कल्याण शहरप्रमुख सचिन बासरे, अभिजीत सावंत, प्रकाश तेलगोटे, युवा अधिकारी प्रतीक पाटील, शाखाप्रमुख सचिन जोशी, राहुल भगत, प्रमोद कांबळे, जयश्री जोशी, प्रियंका विचारे, सानिका खाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मनपा निवडणुकीची ‘मनसे’ची तयारी, मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये वाढणाऱ्या या रुग्णांबाबत राज ठाकरे यांची मोठी भूमिका मनपा निवडणुकीची ‘मनसे’ची तयारी, मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये वाढणाऱ्या या रुग्णांबाबत राज ठाकरे यांची मोठी भूमिका
MNS Raj Thackeray: राज ठाकरे यांनी शुक्रवारी मुंबई मनपा आयुक्तांची भेट घेतली. या भेटीत मुंबई शहरातील दोन महत्वाच्या प्रश्नांवर राज...
छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी, विकिपीडियाची आता बोबडी वळली, सायबर पोलिसांनी अशी काढली खुमखुमी
मोठी बातमी! ‘तुझे तुकडे तुकडे करू तूला…’, भाजप नेत्याला धमकीचं पत्र
‘छावा’मुळे चर्चेत असलेल्या रश्मिकाकडे कोट्यवधींची प्रॉपर्टी, 5 महागड्या गाड्या, जाणून घ्या नेटवर्थ
प्रियांका चोप्राने एअरपोर्टवर चाहत्यांची माफी का मागितली? नेटकऱ्यांकडून कौतुक
शिवाजी नाही, छत्रपती शिवाजी महाराज; ‘छावा’मध्ये औरंगजेबाला ठणकावून सांगणारा तो बालकलाकार कोण?
अखेर ‘या’ तारखेला प्राजक्ता अडकणार विवाहबंधनात; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव