अनवाणी फिरणाऱ्या वाल्मीक कराडकडं गोल्डन आयफोन, लक्झरी गाड्या अन्… डेटा रिकव्हर होताच राजेशाही थाट आला समोर

अनवाणी फिरणाऱ्या वाल्मीक कराडकडं गोल्डन आयफोन, लक्झरी गाड्या अन्… डेटा रिकव्हर होताच राजेशाही थाट आला समोर

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सीआयडीने आरोपपत्र दाखल केले आहे. यात धनंजय मुंडे यांचा जवळच्या वाल्मीक कराड क्रमांक एकचा आरोपी आहे. संतोष देशमुख हत्याकांडाचा वाल्मीकच सूत्रधार असल्याचे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. सीआयडीने न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रातून आणखीही बरीच धक्कादायक माहिती समोर आली आहे.

वाल्मीक कराड याच्या संपत्तीचा तपशील आरोपपत्रातून समोर आला आहे. वाल्मीककडे तीन आयफोन होते. संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर वाल्मीकडने तिन्ही आयफोनमधील डेटा डिलिट केला होता. मात्र वाल्मीकला अटक होताच त्याच्याकडील तिन्ही आयफोन तपास यंत्रणांनी ताब्यात घेतले आणि तंत्रज्ञांच्या मदतीने यातील डेटा रिकव्हर केला. त्यानंतर पोलिसांच्या हाती महत्त्वूपूर्ण माहिती लागली आहे.

अनवाणी फिरणारा वाल्मीक कराड हा महागड्या फोनचा शौकीन होता. त्याच्याकडे तीन आयफोन होते. सध्या तो आयफोनच्या लक्झरी सीरीजमधील गोल्डन रंगाचा आयफोन 16 प्रो वापरत होता. त्याच्याकडे गोल्डन रंगाचा आयफोन 13 प्रो आणि फिक्कट निळ्या रंगाचा आयफोन 13 प्रो फोन देखील होता. यातील गोल्डन रंगाच्या आयफोनची किंमतच 3 लाखांपर्यंत असून इतर फोनची किंमत दीड ते दोन लाखांच्या घरात आहे.

वाल्मीक कराड याच्या आणि त्याच्या पत्नीच्या नावावरही अनेक ठिकाणी मालमत्ता आहे. पुण्यातील सर्वात हायप्रोफाईल समजल्या जाणाऱ्या मगरपट्टा सिटी आणि एफसी रोड भागात वाल्मीक करडाची 115 कोटी रुपयांची संपत्ती आहे. यासह त्याच्याकडे अनेक लक्झरी गाड्याही असून या गाड्या जप्त करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयात अर्ज केला आहे.

कराडला मकोका, मुंडेंचा राजीनामा, मग पोलीस अधिकाऱ्यांनाच अभय का?

वाल्मीककडे कोणत्यागाड्या होत्या?

फोर्ड इंडेव्हर – गाडी क्र. MH-44/T-0700
अशोक लेलँड लि.(हायवा) – गाडी क्र. MH-44/U-0700
जॅग्वार लँड रोव्हर इंडिया – गाडी क्र. MH-44/AC-0700
जेसीबी इंडिया लि. – गाडी क्र. MH-44/S-7450
मर्सीडीझ बेन्झ इंडिया प्रा.लि. – गाडी क्र. MH-44/Z-0007
बीएमडब्लु इंडिया प्रा. लि. – गाडी क्र. MH-44/AC-1717
अशोक लेलँड लि.(हायवा) – गाडी क्र. MH-44/U-1600

मुख्यमंत्र्यांनी दम भरला आणि धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला, पडद्यामागं काय घडलं? संजय राऊत यांनी सांगितलं

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

स्वारगेट बलात्कार प्रकरण – पोलीस गणवेशात आरोपी गाडेचा होता एसटी स्थानकात वावर स्वारगेट बलात्कार प्रकरण – पोलीस गणवेशात आरोपी गाडेचा होता एसटी स्थानकात वावर
शहरातील मध्यवर्ती स्वारगेट एसटी स्थानकात तरुणीला धमकावून बलात्कार करणारा आरोपी दत्तात्रय गाडे हा पोलिसांचा गणवेश परिधान करून एसटी स्थानकाच्या आवारात...
माझ्याकडून लिहून घ्या, नितीश कुमार पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री होणार नाहीत; प्रशांत किशोर यांचं भाकीत
महिलांची फक्त पूजा करू नका! दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांचे प्रतिपादन
लग्नाचे वचन मोडले म्हणजे बलात्कार नाही – सर्वोच्च न्यायालय
‘जंगलाचा राजा’ गुजरातमध्ये असुरक्षित; अवघ्या दोन वर्षांत 286 सिंहांचा धक्कादायक मृत्यू
सोन्याची तस्करी करताना कन्नड अभिनेत्रीला अटक
अपिलाचा निकाल लागेपर्यंत शिक्षेला स्थगिती