खिलाडी अक्षय कुमारने या ब्लाॅकबस्टर फिल्म करण्यास दिला होता नकार! नंतर हे चित्रपट झाले सुपरहिट

खिलाडी अक्षय कुमारने या ब्लाॅकबस्टर फिल्म करण्यास दिला होता नकार! नंतर हे चित्रपट झाले सुपरहिट

अक्षय कुमारची ओळख ही बाॅलीवुडकरांसाठी नवीन नाही. अक्षयला बाॅलीवुडचा खिलाडी अभिनेता म्हणून ओळखले जाते. वेळेवर येणारा आणि वेळेत चित्रपट पूर्ण करण्यासाठी अक्षयची ओळख आहे. मुख्य म्हणजे अक्षय हा सेटवर अतिशय शिस्तीत काम करत असल्यामुळे अक्षय कुमार सोबत चित्रपट करताना, अभिनेत्री या कायम खुश असतात. सेटवर वेळेआधी येणं आणि दिलेल्या वेळेमध्ये शुटींग संपवुन घरी जाणं हे अक्षय कुमारचं वैशिष्ट्य आहे. परंतु असे असताना अक्षयने काही फिल्म करण्यास दिलेला नकार हा अक्षयला नंतर चांगलाच भारी पडला असणार. कारण या फिल्मनंतर सुपरहिट झाल्या होत्या.

भाग मिल्खा भाग – हिंदुस्थानचे प्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंह यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट होता. यात फरहान अख्तर याने मिल्खा सिंह यांची भूमिका साकारली होती.

भाग मिल्खा भाग– या चित्रपटाने सुरुवातील अक्षय कुमार याला विचारण्यात आलेले होते. परंतु अक्षयने हा चित्रपट करण्यास नकार दिल्यामुळे, हा चित्रपट फरहान अख्तरला मिळाला. फरहान अख्तरसाठी हा चित्रपट एक मैलाचा दगड ठरला हे काही सांगायला नको.

बाजीगर– बाजीगर या चित्रपटात काम करण्याची संधी अक्षय कुमारला होती. परंतु ही संधी नेगेटिव्ह भूमिका असल्याकारणाने अक्षयने भूमिका नाकारली. अक्षयने चित्रपटात काम करण्यास नकार दिल्यामुळे, शाहरुख खानची या सिनेमामध्ये वर्णी लागली. अक्षय कुमारने नाकारलेली ही संधी शाहरुख खानच्या चांगलीच पथ्यावर पडली असे म्हटल्यास वावगं ठरु नये.

रेस – रेस या सिनेमामध्येही अक्षय कुमारला विचारण्यात आले होते. परंतु इतर चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त असल्यामुळे अक्षयने मात्र नकार दिला होता. रेस हा चित्रपट हिट झाल्यानंतर मात्र अक्षयला नकार दिल्याचा पश्चाताप झाल्याचे त्याने एका मुलाखतीत म्हटले होते.

सूर्यवंशम- अमिताभ बच्चन यांच्या मुलाची भूमिकेसाठी अक्षय कुमारला विचारण्यात आले होते. परंतु अक्षय कुमारला हा रोल न आवडल्यामुळे, त्याने ही भूमिका करण्यास नकार दिला. हाही चित्रपट नंतर हिट झाला होता.

वेलकम बॅक- वेलकम बॅक या चित्रपटामध्ये भूमिका करण्यास नकार दिल्यामुळे ही भूमिका जाॅन अब्राहमच्या वाट्याला आली. हा चित्रपट सेमी हिट झाला, परंतु जाॅन अब्राहमच्या करिअरसाठी हा चित्रपट खूपच उत्तम ठरला होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

स्वारगेट बलात्कार प्रकरण – पोलीस गणवेशात आरोपी गाडेचा होता एसटी स्थानकात वावर स्वारगेट बलात्कार प्रकरण – पोलीस गणवेशात आरोपी गाडेचा होता एसटी स्थानकात वावर
शहरातील मध्यवर्ती स्वारगेट एसटी स्थानकात तरुणीला धमकावून बलात्कार करणारा आरोपी दत्तात्रय गाडे हा पोलिसांचा गणवेश परिधान करून एसटी स्थानकाच्या आवारात...
माझ्याकडून लिहून घ्या, नितीश कुमार पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री होणार नाहीत; प्रशांत किशोर यांचं भाकीत
महिलांची फक्त पूजा करू नका! दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांचे प्रतिपादन
लग्नाचे वचन मोडले म्हणजे बलात्कार नाही – सर्वोच्च न्यायालय
‘जंगलाचा राजा’ गुजरातमध्ये असुरक्षित; अवघ्या दोन वर्षांत 286 सिंहांचा धक्कादायक मृत्यू
सोन्याची तस्करी करताना कन्नड अभिनेत्रीला अटक
अपिलाचा निकाल लागेपर्यंत शिक्षेला स्थगिती