Maharashtra Budget Session 2025 – छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना अटक करा, विरोधक आक्रमक
छत्रपती का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्थान, कोश्यारी ते कोरटकर यांना पाठीशी घालणाऱ्या महायुती सरकारचा धिक्कार असो… कोश्यारी ते कोरटकर हरामखोर… हरामखोर… अशी जोरदार घोषणाबाजी करत विरोधकांनी आज विधानभवन परिसर दणाणून सोडला. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना अटक करा, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली.
विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, भाई जगताप यांच्यासह महाविकास आघाडीतील आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांना अटक करा, अशी मागणी यावेळी विरोधकांनी केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List